Breaking
महाराष्ट्र

निफाड तालुक्यातील वेळापूर येथे रामनवमी व ग्रामदैवत गवळी बाबा यात्रा उत्सवात साजरी

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 0 8 0

न्यायभूमी न्यूज 

खेडलेझुंगे / बाबा गिते 

निफाड व येवला तालुक्याच्या शिवेवर असलेल्या वेळापुर येथे चैत्र शुक्ल ९ रामनवमी या दिवशी सालाबादाप्रमाणे अतिशय आनंदात आणि उत्साहात श्रीराम नवमी उत्सव साजरा होत असतो. तसेच याच दिवशी ग्रामदैवत गवळी बाबा यांचे यात्रा उत्सव भरत असते. 

 

यावेळी गावातील तरुण व जेष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालत आलेल्या परंपरेनुसार गोदावरी नदीचे पवित्र जल कावडीच्या माध्यमातून अनवाणी पायांनी नांदूरमधमेश्वर ते वेळापूर पर्यंत आणले जाते.

त्या पाण्याची (कावड) गावातील पारंपारिक वाद्य संभळ व ढोल पथकाच्या माध्यमातून कावड मिरवणूक काढली जाते. गावात सडा रांगोळी काढली जाते.

ग्रामदैवत गवळीबाबा मंदिर व श्रीराम मंदिर यांच्यावर विद्युत रोषणाई करण्यात येऊन राम नामाचा जागर करण्यात येत असतो.

गावात रंगबेरंगी पताका लावण्यात आलेल्या आहेत. रामनवमी व ग्रामदेवता गवळी बाबा यात्रेनिमित्त पार्थना व नवस केले जातात. यावेळी नारळ, पेढे, गुळाचा मलिदा यांचा प्रसाद म्हणून एकमेकांना वाटप करतात.

यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.

सकाळी रामरक्षा स्तोत्र पठण, कावड मिरवणूक

दुपारी भजन, रात्री लोकनाट्य तमाशा, व कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे