Breaking
संपादकीय

लासलगांव येथे भक्तिमय़ वातावरणात श्रीराम जयंती साजरी महिला वर्गाची उपस्थिती

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 0 9 6

न्यायभूमी न्यूज

नाशिक ( लासलगाव )  बाबा गिते प्रतिनिधी नाशिक जिल्हा 

लासलगाव येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सर्व लासलगावकरांच्या उत्साहाला उधाण आले होते. सालाबाद प्रमाणे यंदाही प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

प्रातःकाली श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांच्या मुर्तीला अभिषेक करण्यात आला. सकाळी दहा ते बारा या वेळेत ह.भ.प. वाल्मिक महाराज जाधव यांचे सुश्राव्य असा किर्तनाच्या कार्यक्रम झाले.

बारा वाजता जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. श्रीराम मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. बाबा अमरनाथ मंदिर, बस आगार लासलगाव येथे सायंकाळी ५ वा. हजारोंच्या उपस्थितीत श्री हनुमान चालीसाचे अकरा पाठ पठन करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक वाद्यवृंदांसह भव्य रथ आणि पालखी मिरवणूकीला सुरुवात झाली.

या शोभायात्रेत पारंपरिक वाद्यांच्या गजरात मार्गक्रमन करत असताना ठिकठिकाणी फटाक्यांची भव्य आतिशबाजी करण्यात आली होती. मिरवणुकीत ‘एकही नारा एकही नाम । जय श्रीराम जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय, पवनसूत हनुमान कि जय’ अशा घोषणा देण्यात आल्या.

सर्वांचा पोषाख पारंपरिक होता. प्रत्येकाने भगवी टोपी परिधान केली होती तर महिला केशरी आणि पिवळ्या रंगाच्या वेशभुषेत होत्या. यावेळी महिलांची उपस्थिती उल्लेखनिय होती. 

प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सितामाता, बजरंग बली हनुमान तसेच लव आणि कुश यांच्या वेशभुषेत अनुक्रमे आर्यन पवार, शौर्य झांबरे, आराध्या जोशी, धैर्य कासार, रिद्धी कासट आणि सिद्धी कासट हे चिमुकले चित्ररथावर आरूढ झाले होते. मिरवणुक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

संपूर्ण गावात चहुकडे भगवे झेंडे मोठ्या डौलाने फडकत होते. मिरवणुक मार्गावर भगवे झएंडे, पताका, आणि फलक लावण्यात आलेले होते. फटाक्यांच्या आतिषबाजीने कार्यक्रमाची शोभा वाढत होती. तसेच या मिरवणुकीमध्ये २१ फुटी मारुतीरायांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.

श्रीराम जन्मोत्सव समितीने केलेल्या आवाहनाला लासलगाव शहरातील सर्व सांस्कृतिक मंडळे, लहान मोठे दुकानदार, व्यावसायिक संघटनांनी आपापली व्यवस्थापने बंद ठेवून या शोभायात्रेत आपला महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला. एकुणच संपूर्ण परिसर भक्तिमय होवुन गेला होता.

मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन लासलगांव पोलीस ठाण्याच्या वतीने चोक बंदोबस्त लावण्यात आलेला होता.

श्रीराम नवमी जन्मोत्सवानिमित्त आयोजीत सर्व धार्मिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात कोणत्याही प्रकाचे गालबोट न लागता निर्विघ्नपणे पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल श्रीराम जन्मोत्सव समितीने सर्वांचे आभार मानले असुन येत्या ६ एप्रील २०२३ रोजी श्री हनुमान जयंतीसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे