Breaking
महाराष्ट्र

श्रीक्षेत्र खेडलेझुंगे येथे एकही नारा एकही नाम जय श्रीराम जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान कि जय’ घोषात श्रीराम नवमी उत्साहात साजरी

1 4 4 0 9 9

न्यायभूमी न्यूज 

खेडलेझुंगे / बाबा गिते

पवित्र गोदावरीच्या तीरावर वसलेले श्रीक्षेत्र खेडलेझुंगे येथे श्रीराम नवमी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणार साजरी करण्यात आली.

यावेळी रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक कमानी, श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये द्राक्षाची आरास आणि रोषणाईने सजविलेल्या मंदिरांमध्ये दुपारी श्रीरामाचा जयघोष झाला.. अन् ‘राम जन्मला गं सखी, राम जन्मला’, ‘सियावर रामचंद्र की जय… पवनसुत हनुमान की जय… प्रभू रामचंद्र भगवान की जय’… अशा जयघोषाने खेडलेझुंगे येथील श्रीराम मंदिर परिसर दुमदुमदून गेला. कीर्तन, भजन आणि श्रीरामाच्या नामस्मरणाने खेडलेझुंगे येथील श्रीराम मंदिरातील आणि मंदिर परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते.

 

सालाबादाप्रमाणे गुढीपाडवा ते श्रीराम नवमी निमित्त दिवसभरात काकड आरती, भजन, प्रवचन, किर्तनाचे आयोजन केले जाते. या भक्तीमय वातावरणात खेडलेझुंगे येथे श्रीराम नवमीचे किर्तनाची सेवा गुरुवर्य ह.भ.प. रघुनाथ महाराज खेडलेकर यांच्या राम जन्माच्या कीर्तनाने संपन्न झाली. खेडलेझुंगे येथे श्रीराम नवमीच्या निमित्ताने यात्रा भरत असते.

या यात्रेला गावातील आणि पंचक्रोशीतील नागरीकांची मोठी उपस्थीती असते. तसेच गावातील नोकरी, व्यावसायानिमित्त बाहेरगावी गेलेल्या सर्वांची उपस्थिती असते. जन्मोत्सवानिमित्त श्रीरामाची मूर्ती, गाभारा, सभामंडप आणि मंदिराचा परिसर द्राक्षांच्या आरास फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजविण्यात आला होता. येथील संतवानामध्ये उत्सव समितीच्या वतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

 

यावेळी सायंकाळी काढलेल्या श्रीराम रथाच्या मिरवणुकीत ‘एकही नारा एकही नाम… जय श्रीराम जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान कि जय’ अशा घोषणा देण्यात आल्या. सर्वांचा पोशाख पारंपरिक होता. यावेळी महिलांची उपस्थिती उल्लेखनिय होती.

सायंकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि शेकडो तुळशी वृंदावन आणि कलश घेवुन महिलांच्या उपस्थीतीमध्ये श्रीराम रथाची मिरवणूक काढण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे