Breaking
महाराष्ट्र

महिला बचत गटाची मशाल रॅली येवल्यात संपन्न

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 3 1

न्यायभूमी न्यूज

येवला एकनाथ भालेराव विशेष प्रतिनिधी

येवला नगरपरिषद येवला राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व ऑल इंडिया इन्स्टिट्यूट लोकल सेल्फ गव्हर्नमेंट अंतर्गत स्वच्छोत्सव-2023″ स्वच्छता मशाल मार्च महिलांची मशाल रॅली चे मुख्यधिकारी नागेंद्र मुटकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे नियोजन करण्यात आले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉम्प्लेक्स पासून या रॅलीला सुरुवात झाली ते विंचूर चौफुली शनी पटांगण मेन रोड जुनी नगरपालिका रोड ते आझाद मैदान येथे रॅलीचं समारोप करण्यात आला रॅली प्रसंगी महिलांनी स्वच्छ भारत सुंदर भारत झाडे लावा झाडे जगवा नारीशक्तीचा विजय असो स्वच्छ शहर सुंदर शहर भारत माता की जय आशा जय घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाले आझाद मैदान येथे सर्व महिलांनी माजी वसुंधराची हरित शपथ घेतली.

या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी गोविंद गवंडे समुदाय स्वच्छता निरीक्षक सागर झावरे प्रतीक उंबरे संघटक सुषमा विखे प्रकल्प अधिकारी संदीप बोढरे सरस्वती तुंबारे सहयोगिनी उज्वला पानमळे वैशाली चव्हाण शहर स्तरीय संघाचे अध्यक्ष रेखाताई साबळे शहरातील सर्व बचत गटातील महिला स्वच्छता कर्मचारी महिला आदी उपस्थित होते.

  

 स्वच्छतेमध्ये महिलांची महत्वाची भूमिका असून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत लोकसहभागावर भर देताना त्यामध्ये महिलांच्या स्वच्छता कार्यातील सहभागावर विशेष लक्ष केंद्रीत करणारा “स्वच्छोत्सव-2023” हा अभिनव उपक्रम ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत या उपक्रमाव्दारे महिलांचा स्वच्छतेतील सहभाग अतिशय महत्त्वाचा असून या उपक्रमात महिलांनी सहभाग घेतल्याने मुख्यधिकारी यांनी महिलांचे कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे