Breaking
महाराष्ट्र

श्री कालभैरवनाथ मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 2 7

न्यायभूमी न्यूज 

लासलगाव अनिल भावसार

येथील जागृत असलेले श्री कालभैरवनाथ मंदिराचा ५वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी मंदिरात मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून अभिषेक करण्यात आला.

        सायंकाळी श्री कालभैरवनाथ मंदिरात महाआरती संपन्न झाली. यावेळी श्री भैरवनाथ महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.

महामंडलेश्वर महंत श्रीश्री १००८ श्री शिवगिरीजी महाराज यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. शहरातील विविध मार्गावरून वाजत गाजत आकर्षक सजावट केलेल्या रथातून ही मिरवणूक संपन्न झाली.

मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला पुरुष भाविक सहभागी झाले होते. भगरी बाबा मंदिर येथे गोरे परिवाराने महाप्रसादाचे आयोजन केले होते.

यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे