Breaking
गुन्हेगारीब्रेकिंग

लासलगावात भर रस्त्या लगत मोबाईल दुकानात चोरी लाखोंचा ऐवज लंपास पोलीस प्रशासनावर तपासाचे मोठे आव्हान बघा सविस्तर न्यायभूमी न्यूज ला

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 1 7

न्यायभूमी न्यूज

लासलगाव अनिल भावसार / बाबा गिते 

दुकानातील सर्व सिसिटीव्ही कॅमेऱ्यांचे कनेक्शन तोडून डिव्हीआर लंपास… पोलिसांपुढे तपासाचे आव्हान

लासलगाव येथील मोबाइल दुकानाचे मागील बाजूचे शटर तोडून चोरट्यांनी श्री मयूर दिलीप वाघचौरे यांच्या श्री समर्थ कृपा फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक या दुकानातील विविध कंपन्यांचे अंदाजे प्राथमिक अंदाज २५ ते ३० लाख रुपयांचे महागडे मोबाइल लांबविल्याचे दिसून येत आहे.

दुकान मालक यांनी सांगितलेली माहिती बघूया खालील विडिओ पाहा 

घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ पथकासह घटना स्थळावर हजर झाले.

शनिवारी (दि.०१) रात्री ११.३० ते १ च्या सुमारास येथील एसटी स्टॅंडसमोरील पेट्रोलपम्पलगत श्री मयूर वाघचौरे यांचे श्री समर्थ कृपा फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक दुकामध्ये धाडसी चोरी करण्यात आली.

गजबजलेल्या आणि मध्यरात्रीपर्यंत नागरिकांची रेलचेल असलेल्या स्टेशन रोड आणि त्यातली त्यात बस स्टॅन्ड समोर अशी धाडशी चोरीची पहिली घटना लासलगाव येथे घडली आहे. घडलेल्या घटनेमुळे एसटी स्टँड परिसरातील व्यापारी वर्ग धास्तावले आहेत.

 

या परिसरामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बीएसएनएल कार्यालय, एसटी डेपो व स्टॅन्ड, लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक, हॉस्पिटल, पेट्रोल पंप, मोबाईल दुकाने, इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रीची दुकाने, कृषी दुकाने, किराणा दुकान, खाद्य पदार्थ विक्रीची दुकाने, ग्राहक सेवा केंद्र सारखे अनेक विविध दुकाने आहेत.

 

अंदाजे तीन ते चार चोरट्यांनी नियोजन बद्धरीत्या रेकी करून ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे स्पष्ट पणे निदर्शनास आले आहे.

चोरीमध्ये वापरण्यात आलेली दुचाकी ही येथील कपड्यांचे सेल मालकाची असल्याची कळते. सदर गाडी ही सकाळी तपास करत असतांना स्टेशन रोड लगत आढळून आली.

यावेळी श्वानपथकाला पाचारण केले. परंतु दुकानापसूनच चोरटे दुचाकीवरून पळून गेल्याचे सिसिटीव्ही फुटेजमधून दिसून आल्याने श्वानपथक तपास न करताच पून्हा माघारी फिरले.

फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी पाचरण करून फिंगरप्रिंट एक्सपर्ट दुकानातील फिंगरप्रिंट्सचे चित्रीकरण करत आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले जात आहे.

लवकरच गुन्ह्याचा छडा लावला जाईल, असा विश्वास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी व्यक्त केला. 

 

पोलिसांपुढे आव्हान 

ऐन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक काळात मोबाइल दुकानात चोरी झाल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असले तरी श्वानपथकासह पोलिसांच्या हाती ठोस माहिती न लागल्याने ही चोरी उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान लासलगाव पोलिसांसमाेर आहे. 

चोरी झालेल्या दुकानाशेजारील पेट्रोलपंप, आणि अनेक दुकानातील सिसिटीव्ही कॅमेरे तपासणीचे काम पोलीस स्टेशन करत आहे.

यातील पेट्रोल पंपच्या कॅमेऱ्यामध्ये तीन चोरटे कैद झाले असले तरी या धाडसी चोरीचा शोध लावण्याचे आव्हान लासलगाव पाेलिसांसमाेर आहे. 

रेकी करत केली चोरी

घटनाक्रम

 संशयितांनी रेकी करून चोरी केली असावी. दुकानाच्या मागील बाजूच्या शटरची एक बाजू लोखंडी गजाच्या साहाय्याने वर करून दुकानात प्रवेश

दुकानाच्या मागील बाजूस बाहेरच्या बाजूने लावण्यात आलेला कॅमेरा तोडलेला होता.

 तसेच दुकानाच्या आतील बाजूस लावण्यात आलेले सर्व कॅमेऱ्यांचे कनेक्शन चोरट्यानी तोडलेले होते.

कॅमेराचे रेकॉर्डिंग संच (डिव्हीआर) चोरट्यानी सोबत नेला आहे. त्यामुळे दुकानातील फुटेज मिळणे अवघड आहे.

अनेक नामांकित कंपनीचे महागडे मोबाईल, टॅब, असेसरीज व इतर इलेक्ट्रिक साहित्य चोरून घेऊन गेलेले आहेत.

 

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे