Breaking
ब्रेकिंग

चांदवड तालुक्यातील धक्कादायक प्रकार सरपंचा कडून सामान्य व्यक्तीस मारहाण

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 0 9 9

न्यायभूमी न्यूज

चांदवड प्रतिनिधी सोमनाथ जाधव 

 

चांदवड- तालुक्यातील खडक ओझर येथील शेतकरी संजय पगार यांनी सरपंच सागर पगार यांना मित्राच्या विहिरीसाठी सही देत नसल्याच्या कारणावरून फेसबुक वरती पोस्ट टाकली होती.

त्याचा राग मनात घेऊन सरपंच सागर पगार यांच्यासह पंधरा-वीस गुंडांनी संजय पगार यांच्या दुकानात घुसून तोडफोड करत त्यांना मारहाण केली.

या मारहाणी नंतर संजय पगार यांची तब्येत बिघडली.

त्यांना तातडीने नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता केंद्रात दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहे.

या मारहाणीची संपूर्ण घटना संजय पगार यांच्या दुकानांमधील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेले आहे.

जनतेनं सरपंच निवडून दिला आहे.

अन्याय्य विरुद्ध आवाज उठून सामान्य जनतेला न्याय मिळवून देईल.

परंतु सरपंच च अन्याय करत असेल तर हे जनतेचं दुर्दैव आहे.

यांनी केलेल्या मारहाणीचा आणि गुंडगिरीचा संपूर्ण गाव तीव्र निषेध करत आहे.

तक्राळ सरपंचा ना निलंबित करावे. 

अशी मागणी होत आहे.

 

या कडे शासनाने लक्ष देऊन योग्य तो न्याय ह्या गावातील जनतेला देवा अशी मागणी गावकरी करत आहे.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे