Breaking
राजकिय

लासलगाव बाजार समितीची निवडणूक अतिशय चुरशीची लढत सभापतीचा तिढा कायम अपक्ष उमेदवार प्रवीण कदम ठरणार किंगमेकर

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 2 8

न्यायभूमी न्यूज

लासलगाव सुनील पोळ सह संपादक 

लासलगाव बाजार समितीची निवडणूक अतिशय चुरशीची झाल्यामुळे तसेच कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे सभापतीचा तिढा कायम असून अपक्ष प्रवीण कदम यांच्यावरती सर्व धुरा अवलंबून आहे. 

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती तिचे निकाल जाहीर झाले असून अतिशय चुरशीची लढत या ठिकाणी बघायला मिळाली आहे.

पंढरीनाथ थोरे गटाला 9 जागा तर जयदत्त होळकर गट 8 जागा आणि अपक्ष एक जागा. सोसायटी मतदार जनरल गटात जयदत्त होळकर बाळासाहेब शिरसागर संदीप दरेकर भिमराज काळे छबुराव जाधव राजेंद्र ढोकळे गणेश डोमाळे डॉक्टर श्रीकांत आवारे तानाजी आंधळे सोनिया होळकर सुवर्णा जगताप तसेच हमाल गटात रमेश पालवे 209 विजयी, वाकचौरे 185, 

ग्रामपंचायत सर्वसाधारण गटामध्ये डी के जगताप 303 जागांवर विजयी पंढरीनाथ थोरे 322,गोपीनाथ ठुबे 239, दिलीप गायकवाड 156 केशव जाधव 10 आर्थिक दुर्बल गटात बोरगुडे 250 सुराशे 217 डुंबरे 59 बाद 41 अनुसूचित जाती महेश पठाडे 224 जागांवर विजयी अरुण रांगोळी 202 जागा राहुल शेजवळ 90 जागांवर विजयी झाले असून या ठिकाणी बहुमत कुठल्याही प्रकारे सिद्ध झालेली नाही.

कोणत्याही गटाला बहुमत न मिळाल्यामुळे आता कोण कोणाची संगणमत करून बहुमत मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

अपक्ष प्रवीण कदम हे आता कोणाची साथ देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे