Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा कार्यक्रमांतर्गत डॉक्टर भारतीताई पवार यांच्या हस्ते महिलांना मोफत हेल्मेट वाटप

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 2 9

न्यायभूमी न्यूज

नासिक कार्तिक राऊत प्रतिनिधी 

दिंडोरी येथे ९ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा व उपायोजना चर्चासत्र परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य, ऑल इंडिया फेडरेशन व आरटीओ कार्यकारी अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या चर्चासत्रामध्ये आरटीओ अधिकारी अश्विनी निकम यांनी उपस्थितांना रस्ता सुरक्षा बाबत मार्गदर्शन करत संबोधित केले.

यामध्ये हेल्मेट वापरणे ,सिट बेल्ट वापरणे तसेच रस्त्यावरून चालताना नेहमी उजव्या बाजूने चालावे अपघातग्रस्तांना वेळेवर मदत करणे.

तसेच वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावे असे उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. आरटीओ अधिकारी माधुरी पालवे यांनी उपस्थितांना रस्ता सुरक्षा शपथ दिली.

तसेच केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री डॉ. भारतीताई पवार यांच्या हस्ते मोफत हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक येथील सर्व महिला अधिकारी श्रीमती. नमिता सानप, देविका गुंजाळ, स्वाती सरदार, क्षितिजा साळुंखे, प्रांजली देवरे, प्रची मोडक, प्रांजल सोनावणे, श्रध्दा पगार, मोनिका आचरे, स्नेहा चौधरी इ. उपस्थित होत्या.

यावेळी लक्ष्मणराव गायकवाड,नितीनजी गांगुर्डे,नरेंद्र जाधव,श्याम मुरकुटे,शाम बोडके, चंद्रकांत राजे, नरेंद्र जाधव, प्रमोद शेठ देशमुख, योगेश बर्डे, तुषार वाघमारे, योगेश तिडके,योगेश मातेरे,मनीषा ताई बोडके,अमर राजे,रणजीत देशमुख ,उज्वला कोठावदे, अरुणा देशमुख,मित्रानंद जाधव, कैलास धात्रक,संजय बोडके, प्रज्ञा वाघमारे, डॉ.विशाल देशपांडे, पंढरीनाथ पिंगळे, मंगला शिंदे,गणेश बोडके,श्याम बोडके, दिलीप बोडके, संजय ढगे, योगेश बोडके, शैलेश धात्रक, विलास भाऊ देशमुख, अमर बोडके, रघुनाथ गामने, फारूक बाबा,डॉ. देशपांडे,भास्कर गवळी, प्रभाकर वडजे, बाबुशेठ मणियार, अमोल गायकवाड,गणेश गायकवाड, अमोल खोडे व मोठया संख्येने महिला,विद्यार्थी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे