Breaking
ब्रेकिंग

लासलगाव विंचूर सह सोळा गाव देखभाल दुरुस्ती समितीच्या निषेधार्थ सुरू असलेले शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांचे बेमुदत उपोषण केंद्रीय आरोग्य मंत्री खा.भारतीताई पवारांच्या मध्यस्थीने मागण्या मान्य झाल्याने बेमुदत आमरण उपोषण अखेर मागे

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 0 9 5

न्यायभूमी न्यूज 

लासलगाव 

लासलगाव विंचूर सह सोळा गाव पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती योजनेच्या मनमानी कारभार विरुद्ध शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालय लासलगाव येथे शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते.

त्यानंतर या प्रकरणाची दखल घेऊन खा.भारतीताई पवार यांनी नाशिक येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजता तातडीची बैठक घेऊन त्यादरम्यान तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांना वीसी द्वारे संपर्क करून चर्चा केली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे अधिकारी यांच्याशी सदर प्रश्न संदर्भात चर्चा करून सविस्तर अहवाल व पूर्ण योजनेबाबत माहिती घेऊन दोन महिन्यात योजना सुरू करून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबत कडक भाषेत सूचना केल्या होत्या.

त्यानंतर आज बुधवार दिनांक 3 मे रोजी त्यांचे स्वीय सहाय्यक डॉ. उन्मेष काळे सर व नासिक जीवन प्राधिकरण चे शाखा अभियंता प्रताप पाटील साहेब, शाखा उपअभियंता ए. वाय. निकम सहाय्यक अभियंता अशोक बिन्नर यांनी सकाळी 11 वाजता लासलगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे समक्ष भेट घेऊन सदर योजनेची 6 एप्रिल 2024 पर्यंत कामाची मुदत आहे.

तरी आपण त्या कामापैकी अर्धवाहिनी सहा किलोमीटर पर्यंत बदलणे व जलशुद्धीकरण दुरुस्ती हिन कामे जुलै 2023 पर्यंत दोन महिन्यात विना अडथळा पूर्ण करून नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करून देण्याची व उच्चस्तरीय चौकशी करून कडक कारवाई करून15 दिवसात नवीन सचिव नेमू तसेच थकबाकीचे नाव खाली तोडलेले नळ कनेक्शन तात्काळ जोडण्याच्या सूचना खा.भारतीताई पवार यांनी दिल्या आहे असे लेखी पत्र तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांना सुपूर्त केले व उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

तसेच खा.भारतीताई पवार यांनी दूरध्वनी द्वारे उपोषण मागे घेण्याची विनंती केली भारती ताईच्या विनंतीचा मान राखून शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश सर्जेराव पाटील यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला व पुरुष यांचे उपस्थितीत पत्रक हातात घेऊन 51 तास सुरू असलेले उपोषण त्यांच्या मुलीकडून नित्या प्रकाश पाटील यांच्या हाताने लिंबू पाणी पिऊन दुपारी 2 वाजता उपोषण मागे घेतले.

यावेळी महिला आक्रमक झाल्या होत्या त्यांनी दोन महिन्यात शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठा नळाद्वारे न झाल्यास आमदार व खासदार यांना गाव बंदी करू ग्रामपंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला.

यावेळी लासलगाव सह पिंपळगाव नजीक टाकळी विंचूर कोटमगाव येथील महिला वर्ग हजारोंच्या संख्येने येऊन त्यांनी लासलगाव विंचूर सोहळा गाव पाणीपुरवठा समितीच्या व प्रशासनाचे विरोधात आक्रमक भूमिका दाखून उपोषणाला पाठिंबा दिला होता.

तसेच लासलगावातील शेकडो युवकांनी समितीचे सचिव तथा लासलगावचे ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांना घेरावा घातला असता वेळीच पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करून पुढील होणारा अनर्थ टाळला लासलगाव विंचूर कोटमगाव टाकळी विंचूर इतर गावातील हजारो युवकांनी सात ते आठ वर्षापासून लासलगाव 16 गावांना दूषित पाणीपुरवठा करणाऱ्या समितीला बरखास्ती बाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना देखील ई-मेल द्वारे सचिवावर कायदेशीर कडक कारवाई होणे बाबत विनंती केली आहे.

उपोषण सोडते वेळी सर्कल अधिकारी डी एस देवकाते लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ साहेब तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक प्रवीण कदम डी के जगताप सुवर्णा जगताप अमृता ताई पवार गणेश डोमाडे छबुराव जाधव यांसह लासलगाव पिंपळगाव नजीक टाकळी विंचूर कोटमगाव येथील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच यांसह हजारोंच्या संख्येने शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त असलेल्या महिला व पुरुष तसेच युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

यावेळी लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी मोठ्या प्रमाणावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे