Breaking
ब्रेकिंग

येवला तहसील कार्यालय तसेच पंचायत समितीच्या कार्यालयाच्या आवारात एजंट चा सुळसुळाट

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 2 4

न्यायभूमी न्यूज

येवला विशेष प्रतिनिधी 

येवला तहसील कार्यालय तसेच पंचायत समितीच्या कार्यालयाच्या आवारात एजंट चा सुळसुळाट

येवला तालुक्यातील गोरगरीब जनतेची फसवणूक एजंट मोठ्या प्रमाणावर करत आहेत.

हजारो रूपये ची लूट करत आहेत.तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालय अधिकारी,कर्मचारी,शिपाई,यांचा ओळखीचा फायदा घेऊन एजंट म्हणून काम करत आहेत. 

अश्या बोगस एजंट ला धाक राहिलेला नाही. हे एजंट कोणाच्या सांगण्यावरून काम करत आहेत यांची चौकशी करण्यात यावी.

 अश्या बोगस एजंट वर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी.

यांना कूठे तरी आळा घालावा. 

 येवला तहसील कार्यालय तसेच पंचायत समितीचे अधिकारी,शिपाई यांचीही हातमिळवणी तर नाही ना एजंट सोबत अशी शंका नागरिकांना येत आहेत. 

येवला तहसील कार्यालयाने आणि पंचायत समिती ने एजंट ला परवानगी दिली आहे कि काय किती जण एजंट म्हणून काम करत आहेत यांची माहिती आहे की नाही.

  तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या आवारात एजंट म्हणून काम करत असलेले बोगसगिरी एजंट वर कठोरात कठोर कारवाई करावी.

अशी येवला तालुक्यातील नागरिकांनी मागणी केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे