Breaking
ब्रेकिंग

शिरवाडे वणी येथे गोमांस घेऊन जाणारी गाडी हस्तगत

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 3 4

न्यायभूमी न्यूज

नाशिक विशेष प्रतिनिधी 

गोहत्या आणि गोमांसला शासनाने बंदी घालण्याचा कायदा केला असला तरी गोहत्या आणि गोमांस वाहतूक, चोरट्या पद्धतीने होत आहे.

नाशिक भागातून चांदवड पिंपळगाव मार्गाने चोरट्या पद्धतीने सुमारे 1500 किलो गोमांस नेणारा पिकप टेम्पो विश्व हिंदू परिषद बजरंग दल पिंपळगाव बसवंत गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी व तसेच स्वराज्य संघटनेचे वडाळीभोई गटप्रमुख ललित भाऊ उशीर यांनी व स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याच्यावर आवाज उठवला.

रविवारी रात्री साडेबारा वाजता पकडून, पिंपळगाव पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

टेम्पोचालक शेख रहमूद्दीन शेख शरफूद्दीन राहणार आझाद नगर धुळे यास पोलिसांनी अटक केली असून, पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

 पिंपळगाव बसवंत येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धुळे मालेगाव चांदवड मार्गे मुंबईकडे जात असताना शिरवडे फाटा येथे रविवारी रात्री साडेबारा वाजता चोरट्या पध्दतीने गोमांस नेणार टेम्पो पकडला.

बजरंग दलाच्या कार्यकर्ते व पिंपळगाव पोलिसांनी रात्री गस्ती घालून ही कारवाई केली पोलीस नाईक करंडे यांच्या तक्रारीवरून पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.

संबंधित प्रकाराचे सूत्रधार त्या गाईंची हत्या कोणत्या कत्तलखान्यात झाली व कोणी केली,यामागे नेमक कोण आहे. 

अशा कामांसाठी अशा लोकांना सपोर्ट करणारे आपले राजकीय नेते व पोलीस डिपार्टमेंट तर नाही ना याची चौकशी लवकरात लवकर व्हावी व हा गुन्हा करणाऱ्या आरोपी चा लवकरात लवकर शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करावी.

अशी मागणी स्वराज्य संघटनेच्या वडाळीभोई येथील कार्यकर्त्यांनी केली आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे