Breaking
ब्रेकिंग

कळवण तालुक्यातील सुरू असलेल्या गावठी दारू हातभट्ट्या उध्वस्त

न्यायभूमी न्यूज महाराष्ट्र संपादकीय विभाग

1 4 4 1 3 6

न्यायभूमी न्युज

हेमंत जाधव वडनेर भैरव

नाशिक ग्रामीण जिल्हयातील अतिदुर्गम भागात अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी दारू हातभट्ट्यांवर पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांचे आदेशान्वये धाडसत्र सुरू आहे. त्याअनुषगांने दिनांक ०५/०६/२०२३ रोजी कळवण तालुक्यातील पिळकोस, बहुर, खामखेडा, चाचेर गावांचे शिवारात गिरणा नदीकाठालगत असलेले विविध ठिकाणांवर पोलीस मुख्यालयातील कृती दलाचे पोलीस जवान व कळवण पोलीसांनी छापे टाकून कारवाई केली आहे.

सदर छापा कारवाईत हातभट्टीच्या दारूची अवैधपणे गाळप करणारे इसम नामेबाळा • काशिनाथ पवार, रा. पिळकोस, ता. कळवण, संजय एकनाथ सुर्यवंशी, रा. पिळकोस, ता. कळवण, शिवमन पठाण सोनवणे, रा. चाचेर शिवार, ता. कळवण यांचेवर छापे टाकून सुमारे १६ लिटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली असून ४८, २००/- रु. किंमतीचे रसायन व साधन सामुग्री जागेवरच नाश करण्यात आली आहे. सदर इसमांविरुध्द कळवण पोलीस ठाणेस महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०३ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

नाशिक ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे कळवण पोलीस ठाण्याचे
पोलीस निरीक्षक समाधान नागरे,.
पोउनि बबन पाटोळे,
पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण कडील कृती दलाचे पोउनि शिवाजी परदेशी,
पोउनि साहेबराव पाटील,
पोउनि शिवाजी जगदाळे, कळवण पोलीस ठाण्याचे अंमलदार पोहवा बोरसे,
पोना पवार तसेच कृतीदलातील जवानांनी सहभाग घेवून वरील ठिकाणांवरील अवैधरित्या सुरू असलेले गावठी दारू हातभट्ट्यांचे समूळ उच्चाटन केले आहे.

गावठी दारू हातभट्टीचे अड्डे आपल्या परिसरात सुरू असल्यास पोलीसांना तात्काळ संपर्क करावा असे आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे. अवैध व्यवसायासंबंधी नागरिकांनी ६२६२ २५६३६३ या हेल्पलाइनवर माहीती द्यावी, माहीती देणा-या इसमाचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी स्पष्ट केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 3 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे