Breaking
ब्रेकिंग

येवला तालुक्यातील सुट्टीवर आलेल्या जवानावर रुग्णालयात प्राणघातक हल्ला

येवला तालुका प्रतिनिधी एकनाथ भालेराव व डॉ.स्वप्नील आहेर

1 4 4 0 9 9

न्यायभूमी न्यूज

येवला २०/०६/२०२३

सेवारत सैनिक मच्छिंद्र शेळके ठाणगाव यांच्या पत्नीला जावाला आणि आईला विरोधकांनी घरी जाऊन मारहाण केली.

येवला तालुक्यातील ठाणगाव येथील रहिवासी असलेले सुटीवर आलेले असताना त्यांच्या गावी शेतीवर वाद झाल्याने ते तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले असतांना पोलिसांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मारहाण झाली असेल तर मेडिकल सर्टिफिकेट घेण्या साठी गेले असतांना तेथे आधीच दबा धरून बसलेल्यांनी जमिनीच्या वादातून लष्करी सैनिक मच्छिंद्र शेळके यांच्यावर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात जीवघेणा हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नाशिक येथील सोपान हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान ह्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आजी माजी सैनिकांच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले.

सदर हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी.

अशी मागणी करण्यात आली.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे