Breaking
ब्रेकिंग

निफाड तालुक्यातील येथे बोकडदरे ग्रामसेविका कार्यमुक्त बघा सविस्तर वृत्त

1 4 4 1 2 4

न्यायभूमी न्यूज 

खेडलेझुंगे / बाबा गिते 

निफाड तालुक्यातील बोकडदरे येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेविका प्रभा चंद्रकांत पटेकर खातेनिहाय चौकशीत दोषी आढळल्याने निफाडच्या गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांना कार्यमुक्त केले आहे.

श्रीमती प्रभा पटेकर या २९ जून २०२१ पासून ग्रामपंचायत बोकडदरे (ता. निफाड) येथे कार्यरत आहेत.

यापूर्वी त्या धार्नोली ( ता. इगतपुरी) ग्रामपंचायत येथे कार्यरत असतांनाची त्यांची विभागीय खाते चौकशी सुरू होती.

सदर खाते चौकशी पूर्ण होऊन त्यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील ९ जून २०२३ च्या आदेशानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ चे नियम ४ ( पाच ) नुसार आदेशाच्या दिनांकापासून म्हणजेच ९ जून २०२३ पासून सक्तीने सेवानिवृत्त केले आहे.

सदर आदेशाची प्रत निफाड पंचायत समितीच्या मेलवर १२ जून २०२३ रोजी प्राप्त झाली असता प्रभा पटेकर यांना १३ जून २०२३ रोजी समक्ष बजविण्यात येऊन त्यांची दिनांकीत स्वाक्षरी घेण्यात आली आहे.

गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी पत्रान्वये लेखी आदेश काढून प्रभा पटेकर यांना ९ जून २०२३ रोजी कार्यालयीन वेळेनंतर कार्यमुक्त करण्यात येत असून, त्यांच्याकडील ग्रामसेवक पदाचा कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेश येईपर्यंत अतुल आढाव यांच्याकडे देण्यात येत असल्याचे नमूद केले आहे.

आढाव यांनी पटेकर यांच्याकडून ग्रामपंचायतचा संपूर्ण कार्यभार, संपूर्ण योजनांच्या दप्तरासह हस्तांतरित करून घ्यावे, असे आदेश काढले आहेत.

गटविकास अधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे संबंधित ग्रामसेविकेला पुढील निर्णयापर्यंत कामकाज करता येणार नसून तोपर्यंत या गावचा कारभार दुसऱ्या ग्रामसेवकाच्या खांद्यावर देण्यात आल्याचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे