Breaking
ब्रेकिंग

चांदवड कडून भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दुचाकी वाहनाला धडक सविस्तर वृत्त न्यायभूमी ला

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 3 7

न्यायभूमी न्यूज

चांदवड वडनेर भैरव

प्रतिनिधी हेमंत जाधव 

मुंबई-आग्रा हायवेवर भीषण अपघात… शिवसेनेच्या तिघा पदाधिकाऱ्यांचा मृत्यू

मुंबई-आग्रा महामार्गावर शिरवाडे वणी येथे भीषण अपघात झाला आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीवरील तिघा तरुणांचा मृत्यू झाला आहे.

हे तिघे तरुण शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत. या दुर्घटनेमुळे शिरवाडे वणी गावावर शोककळा पसरली आहे.

      मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष निफाडे, नितीन निफाडे आणि महेश निफाडे अशी मृत तरुणांची नावे आहेत. यातील सुभाष निफाडे हे निफाड तालुका उपप्रमुख आहेत. हे तिघे जण कामानिमित्त पिंपळगाव बसवंत येथे गेले होते.

त्यांचे काम आटोपून रात्रीच्या सुमारास ते शिरवाडे वणी गावाकडे मुंबई-आग्रा महामार्गाने जात होते. त्याचवेळी चांदवडकडून भरधाव वेगाने येणाऱ्या बसने निफाडे या तरुणांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत तिघा तरुणांचा मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघा तरुणांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

     दरम्यान, शिरवाडे ववणी फाट्यावर सतत अपघात होत असतात. गेल्या काही वर्षात ७५ जणांचा बळी येथे गेला आहे. याठिकाणी उड्डाणपुलाची मागणी असली तरी त्याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने शिरवाडे वणी ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

आताच्या अपघातामुळे गावातील तीन तरुण ठार झाले आहेत. हे तिघेही जण सामाजिक कार्यात अग्रेसर होते. सोमवारी दुपारी त्यांनी शांतता समितीच्या बैठकीत सहभाग घेतला.

तसेच, विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यात ते अग्रेसर होते. त्यांच्या निधनामुळे गावाची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

आज शोकाकुल वातावरणात या तिघा तरुणांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगण्यात आले.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे