Breaking
गुन्हेगारीब्रेकिंग

नासिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला मोठा मासा लागला बघा सविस्तर वृत्त

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 3 8

न्यायभूमी न्यूज

चांदवड प्रतिनिधी सोमनाथ जाधव

जून -२८ 

दिंडोरीचे प्रांत अधिकारी तब्बल 40 लाखांची लाच घेताना जाळ्यात नाशिक : जिल्ह्यात लाचखोरी कमी होण्याचं नाव घेण्यास तयार नाही.

आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला मोठा मासा लागला असून, दिंडोरी येथील प्रांतअधिकारी नीलेश अपार यांना तब्बल 40 लाखांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

लखमापूर येथील एका कंपनीच्या मालकाकडे जागा कायम करण्यासाठी प्रांत अधिकारी निलेश अपार यांनी 40 लाखांच्या लाचेची मागणी केली होती.

याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.त्यानुसार सापळा लावण्यात आला होता.

कार्यालयातच लाच घेताना अपार यांना पथकाने पकडले, गेल्या काही दिवसातील ही आणखी एक मोठी कारवाई आहे.

यापूर्वी जिल्हा उपनिबांधक सतीश खरे, मनपा शिक्षण अधिकारी सुनीता धनगर,आरोग्य विभागातील हिवताप अधिकारी यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते.

आता प्रांत अधिकारी च जाळ्यात सापडल्याने नाशीक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 3 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे