Breaking
ब्रेकिंग

येवला तालुक्यातील एस.एन.डी.अभियांत्रिकी व संशोधन केंद्र महाविद्यालय 15 विद्यार्थ्यांची बायजूज कंपनी मध्ये वार्षिक 7 लाख रुपयाचे पॅकेज वर निवड

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 3 2

न्यायभूमी न्यूज

येवला पुष्पा पाटील प्रतिनिधी 

बाभूळगाव ता. येवला येथील एस एन डी अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र च्या मेकॅनिकल, कॉम्प्युटर, सिव्हिल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी च्या एकूण 15 विद्यार्थ्यांची

बायजूज कंपनी मध्ये बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट या पदावर निवड झाली.त्यांना वार्षिक 7 लाख रुपये पॅकेज देण्यात आले.

महाविद्यालयात ट्रेनिंग & प्लेसमेंट साठी राबविण्यात आलेल्या मुलाखत तयारी , मुलाखत तंत्रज्ञान , सराव चाळणी परीक्षा, गट चर्चा , व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा ईत्यादी विविध उपक्रमांचा फायदा झाला. 

सिव्हिल विभागाच्या वरुण शिंदे , कॉम्प्युटर विभागाच्या पूजा परदेशी ,कावेरी कोल्हे,प्रतिक्षा सोमासे,कोमल कोल्हे, किरण मतसागर, वैष्णवी भावसार, पूजा वाकोडकर,इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या कविता शुक्ला ,गौरी वाघ ,प्रथमेश आग्रे,मयूर भावसार ,प्रिती वाळते व मेकॅनिकल विभागाच्या वैष्णव देवरे, शुभम पाटील यांची निवड झाली.

एच आर मॅनेजर श्री आदित्य खरे व श्री विनय प्रताप सिंह यांनी मुलाखती घेतल्या.प्रा. अतुल पवार व प्रा.पवन बारवकर यांनी नियोजन केले. 

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी . एम यादव, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ हरजीत पवार, सिव्हिल विभागप्रमुख डॉ. उबेद अन्सारी, कॉम्पुटर विभाग प्रमुख डॉ. उमेश पवार, आय. टी. विभागप्रमुख डॉ. पी.पी. रोकडे , प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ विद्या निकाम , इलेक्ट्रिकल विभागप्रमुख डॉ पवन टापरे , एमबीए विभागप्रमुख डॉ व्ही एन उबाळे , शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. अरविंद घोडके , प्लेसमेंट अधिकारी प्रा .अमित सोलंकी ईत्यादीनी अभिनंदन केले. 

तसेच निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष आमदार श्री.नरेंद्रभाऊ दराडे, आमदार श्री. किशोरभाऊ दराडे, सचिव श्री.लक्ष्मणभाऊ दराडे, संचालक श्री. रुपेषभाऊ दराडे व श्री.कुणालभाऊ दराडे यांनी शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे