Breaking
ब्रेकिंग

एस.एन.डी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 3 विद्यार्थ्यांची महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा प्राईव्हेट लिमिटेड मध्ये कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 0 9 1

न्यायभूमी न्यूज

येवला दि. १० ऑगस्ट पुष्पा पाटील

बाभूळगाव ता.येवला येथील एस एन डी.अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र येवला येथे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह झाला.महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा प्राईव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीने सहभाग नोंदविला.सदर ड्राईव्ह मधून 3 विद्यार्थ्यांची निवड झाली.

एकूण मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागाच्या एकूण 56 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.सदर ड्राईव्ह मध्ये दोन राऊंड झाले.पत्रता चाचणी, व्यतिगत व टेक्निकल मुलाखत झाली.एच आर श्री सुशील वारकर सानिका ताम्हाणे मॅडम यांनी मुलाखती घेतल्या.

अंतिम वर्ष मेकॅनिकल विभागाच्या अक्षदा वाघ, अभिषेक अमराळे व प्रतीक जगताप या विद्यार्थ्यांची निवड झाली.दोघांची नाशिक व एकाची कर्नाटकातील जाहिराबाद येथे नियुक्ती करण्यात आली.

त्यांना वार्षिक 4 लाख 5० हजार पॅकेज देण्यात आले.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. एम यादव,इलेक्ट्रिकल विभागप्रमुख डॉ पवन टापरे मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ हरजीत पवार कॉम्पुटर विभाग प्रमुख डॉ.उमेश पवार,आय.टी. विभागप्रमुख डॉ पी.पी.रोकडे, सिव्हिल विभागप्रमुख डॉ उबेद अन्सारी एमबीए विभागप्रमुख डॉ व्ही एन उबाळे व प्लेसमेंट अधिकारी प्रा.अमित सोलंकी यांनी अभिनंदन केले.प्रा.पवन बारवकर व प्रा.अतुल पवार यांनी नियोजन केले.

तसेच निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष आमदार श्री.नरेंद्रभाऊ दराडे,आमदार श्री.किशोरभाऊ दराडे,सचिव श्री.लक्ष्मणभाऊ दराडे, संचालक श्री.रुपेषभाऊ दराडे व श्री.कुणालभाऊ दराडे यांनी शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 9 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे