Breaking
नोकरी

वैद्यकीय अधिकारी डॉ.चैतन्य बैरागी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मॅग्मो संघटना,नाशिक पदाधिकारी यांची बैठक

न्यायभूमी न्यूज नाशिक

1 4 4 0 9 9

न्यायभूमी न्यूज

नाशिक दि. २० ऑगस्ट

वैद्यकीय अधिकारी डॉ.चैतन्य बैरागी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मॅग्मो संघटना, नाशिक पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. त्यात पुढीलप्रमाणे आक्रमकपणे आंदोलनाचा पवित्रा ठरवण्यात आला.

सोमवारी सकाळी 9 वाजता जिल्हा परिषद, नाशिक येथे काळया रंगाच्या पोशाखात सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी यावे. काळया फिती लावून लाक्षणिक धरणे आंदोलन केले जाईल. त्यानंतर मा. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले जाईल.

जोपर्यंत खालील मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन करण्यात येईल.

१) वैद्यकीय अधिकारी यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या आरोपीवर Maharashtra Medicare Service Person and Maharashtra Medicare Institutions Prevention of Violence and Damage or Loss to Property Act 2010 ची कलम लावून तात्काळ अटक करावी.

२) शासकीय दवाखान्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी,महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात,मोफत रुग्णसेवा पुरविताना येणारा वाढत्या रुग्णसंख्येचा अतिरिक्त ताण पाहता सर्व ठिकाणी २४ तास सुरक्षारक्षक सुरक्षा मंडळ/एजन्सी मार्फत नेमावेत.

) सर्व संवर्गाची रिक्त पदे भरण्यात यावीत आणि विशेषत: परिचरांची पदे तात्काळ भरावीत.

४) वैद्यकीय अधिकारी यांना face recognition app द्वारे उपस्थिती नोंदविणे बंधनकारक करण्याआधी वैद्यकीय अधिकारी यांच्या कामाचे तास निश्चित करावेत तसेच केवळ आरोग्य विभागाला उपस्थिती बंधनकारक नसल्याने सर्व शासकीय विभागांना face recognition app द्वारे उपस्थिती नोंदविणे बंधनकारक करावे.

) मोफत रुग्णसेवा पुरविताना येणारा वाढत्या रुग्णसंख्येचा अतिरिक्त ताण पाहता जिल्हा परिषद निधी वा जिल्हा नियोजन समिती निधीमधून पुरेशा प्रमाणात औषध पुरवठा व्हावा.

यासाठी प्रशासनाच्या सहकार्याची अपेक्षा संघटना करत आहे. या मागण्या मान्य न झाल्यास टप्प्या टप्प्यात रुग्णसेवा स्थगित केली जाईल.

मागण्या मान्य करून ठोस उपाययोजना न झाल्यास २४ तासात जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण सेवा बंद केल्या जातील.

त्यानंतरही उपाययोजना न झाल्यास ४८ तासात सर्व शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण तसेच आंतररूग्ण सेवा बंद केल्या जातील.

त्यानंतरही उपाययोजना न झाल्यास ७२ तासात सर्व शासकीय रुग्णालयातील संपूर्ण सेवा बंद केल्या जातील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 9 9

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे