Breaking
संपादकीय

दिव्यांग कल्याण विभाग ‘शासन दिव्यांगांचे दारी’ अभियान

जास्तीतजास्त दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा जिल्हाधिकारी जलज शर्मा

1 4 4 0 4 0

न्यायभूमी न्यूज

चांदवड दि ०१ सप्टेंबर

 प्रतिनिधी सोमनाथ जाधव

शासनाच्या विविध योजनांचा दिव्यांग बांधवांना लाभ मिळवून देण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागामार्फत ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाचे दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम मंगळवार 5 सप्टेंबर 2023 रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी हजर रहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.जिल्ह्यातील विविध विभागातील कार्यान्वित यंत्रणांच्या योजनांचे लाभ या अभियानाच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत.

जिल्हास्तरीय कार्यक्रम 5 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता ठक्कर डोम, त्र्यंबक रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे.

तसेच हा कार्यक्रम दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाचे दारी अभियानाचे मुख्य मार्गदर्शक व अध्यक्ष तथा विधानसभा सदस्य ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या उपस्थितीत होणार आहे. 

या कार्यक्रमास विविध शासकीय विभागाचे स्टॉल लावण्यात येणार असून उपस्थित दिव्यांग बांधवांची नाव नोंदणी व योजनांच्या लाभांची प्रक्रीया पद्धती यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

अशी माहिती ही जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे