Breaking
संपादकीय

सकल मराठा परीवार तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात जालन्यातील घटनेचा निवेदन देऊन निषेध

न्यायभूमी न्यूज मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

1 4 4 0 7 6

न्यायभूमी न्यूज 

नाशिक दि. ०५ सप्टेंबर                                              अंतरवली – सराठी ता. अंबड जि. जालना येथे काही मराठा बांधव हे आपल्या वर्षानुवर्षच्या प्रलंबित मागणीसाठी अतिशय शांततापूर्ण मार्गाने उपोषण आणि आंदोलन करीत होते.

स्वहक्कासाठी अतिशय शांततापूर्ण पद्धतीने मराठा समाज आतापर्यंत अनेक आंदोलने आणि मोर्चे काढत आला आहे. एवढे लाखोने मोर्चे निघाले तरी एक अनुचित घटना कुठे घडल्याचे ऐकिवात नाही किंवा त्याची नोंद नाही.मग आता असे कोणती घटना घडली की,पूर्णपणे जो समुदाय जमला होता त्यांच्यावर रक्त येईपर्यंत लाठीचार्ज करावा लागला. समाजमाध्यमांत जे व्हिडिओ फिरत आहेत, त्यात स्पष्ट दिसून येत आहे की पोलीस मोठा फौजफाटा घेऊन दंगल नियंत्रक उपकरणासह तिथे आले होते. जर उपोषण करणाऱ्या व्यक्तीला हॉस्पिटल मध्ये न्यायचे होते तर एवढा मोठा पोलिसाचा ताफा गरजेचं होता का?

सरकारमधले मंत्री १०-१२ पोलिस होते असे सांगून सत्यपरिस्थिती लपवीत आहेत. हाअमानुष लाठीचार्ज झाला, तो विनाआदेश होऊच शकत नाही.. या घटनेला जे आदेश देणारे मंत्री,पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी जबाबदार आहेत त्यांना निलंबित करून, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक केली जावी या आपल्या मागणीसाठी दिनांक 04/09/2023 रोजी सकल मराठा परिवारातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात 330 तालुक्यांमध्ये जिल्हाधिकारी ,तहसीलदार,प्रांत यांच्यामार्फत सरकारला निवेदन देण्यात आले. 

               मराठा समाज आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक आंदोलन करीत आला आहे. या आंदोलनादरम्यान अनेक मराठा लोकांवर अमानुष आणि कठोर कलमे लावून गुन्हे दाखल केले आहेत. हे सर्व गुन्हे सरसकट रद्द केले जावे. असे गुन्हे दाखल झाल्यामुळे अनेक सामान्य कुटुंबे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या तरुणांवर इतर कोणतेही गुन्हे दाखल नाहीत.

 फक्त समाजासाठी रस्त्यावर उतरले म्हणून त्यांच्यावर असे गुन्हे दाखल होणे योग्य वाटत नाही. त्वरित अशा सर्व तरुणांना निर्दोष मुक्त करावे तसेच याचसोबत ज्यासाठी हि घटना घडली ते म्हणजे ‘आरक्षण’ लवकरात लवकर निकाली काढण्यात यावे. यासाठी जे काही करावे लागेल ते तातडीने करण्यात यावे. वारंवार उपोषणे आंदोलने होत आहेत ती हा प्रश्न सुटल्याशिवाय बंद होणार नाही.५८ क्रांती मोर्चे निघाले होते ते ज्या कारणासाठी निघाले होते त्या कोपर्डीच्या घटनेवर आज शासन बोलायला तयार नाही. कोपर्डीमध्ये ज्या भगिनीवर अत्याचार झाला तिला न्याय मिळाला नसून तिला न्याय मिळावा.

प्रशासनात जी मराठाविरोधी अधिकाऱ्यांची लॉबी तयार झाली आहे, तिला मराठा समाजाच्या प्रश्नांवर काम करण्यास बंदी घालावी. अशा मागण्याही सकल मराठा परिवाराच्या तालुका प्रतिनिधी व एडमिन यांनी प्रशासनासमोर मांडल्या. सकल मराठा परिवार प्रत्येक प्रश्न सामोपचाराने सोडविण्यास प्रशासनाला पुरेपूर मदत करील. पण अंतरवली सारखी वागणूक प्रशासनाने दिली तर मात्र त्याचे पडसाद उमटल्या शिवाय राहणार नाहीत,असे प्रतिपादन सुद्धा सकल मराठा परिवारातर्फे पूर्ण राज्यात करण्यात आले.

नाशिक जिल्ह्यात चांदवड,येवला,नाशिक, निफाड,कळवण,दिंडोरी,सिन्नर या ठिकाणी निवेदन देण्यात आले.

यावेळी सकल मराठा परीवार चे तालुका अध्यक्ष,तालुका प्रतिनिधी,जिल्हा समन्वयक व बांधव उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 7 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे