Breaking
नोकरी

अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 3 8

न्यायभूमी न्यूज

ओझर दि ०८ सप्टेंबर प्रतिनिधी उत्तम गारे 

देवरे वस्ती वावी -ठुशी अंगणवाडी क्र.2 ता.निफाड जि.नाशिक च्या अंगणवाडी सेविका,निफाड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार,जि.प प्राथमिक शाळा वनसगाव चे मुख्याध्यापक आनंदा राजगुरु यांच्या पत्नी सौ.सोनाली आनंदा राजगुरु यांना महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर झाला असून त्यांना महिला व बालकल्याण मंत्री महाराष्ट्र शासन मा.ना.कु.आदिती सुनिल तटकरे यांच्या व मंत्री महोदयांच्या हस्ते घोटी ता.इगतपुरी येथे आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमास अमिशा मित्तल मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नाशिक इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर,श्रीमती रूबल अग्रवाल आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र शासन,डाॅ.अनुककुमार यादव सचिव महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन,डाॅ.अर्जुन गुंडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नाशिक,प्रतिभा संगमनेरे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,दिपक चाटे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जि.प.नाशिक,जलज शर्मा जिल्हाधिकारी नाशिक,जिल्ह्यातील गटविकास अधिकारी,प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 3 8

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे