Breaking
ब्रेकिंग

वडाळीभोई जवळ मोठा अपघात बघा सविस्तर वृत्त

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 0 2 1

न्यायभूमी न्यूज

चांदवड दि १८ सप्टेंबर प्रतिनिधी:- सोमनाथ जाधव 

नाशिक वरुन धुळ्या कडे येणाऱ्या स्विफ्ट कारचा वडाळीभोईजवळ मोठा अपघात चार ठार

 १८ दि सकाळी ७.०० वाजता चांदवड तालुक्यातील नमोकार तीर्थ क्षेत्रा समोरील मुंबई आग्रा महामार्गावर कार व कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला.या भीषण अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले.

 आज सोमवार (दि.18) सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

अपघात ग्रस्तांची अधिक तपास वडणेर भैरव पोलीस करत होते.

 मृतांची नाव त्यात धुळ्यातील नगरसेवक किरण हरींचंद्र अहिरराव,अनिल विष्णू पाटील, कृष्णाकांत चिंधा माळी आणि प्रवीण मधुकर पवार यांचा समावेश आहे.

नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई -आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात झाला.

या अपघातात कार मधील चार जण जागीच ठार झाल्याचे समजले त्यामध्ये किरण अहिरराव धुळ्याचे नगरसेवक होते.

त्या मुळे राजकीय वर्तुळात दुःख व्यक्त होत आहे. हे नाशिकच्या तहसीलदार राजश्री अहिरराव यांचे भाऊ असल्याचे समजते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे