Breaking
संपादकीय

शिरपुर मानव विकास पत्रकार संघ येथील पदाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 0 7 7

न्यायभूमी न्यूज

शिरपूर दि.२४ सप्टेंबर प्रतिनिधी 

जळगांव जिल्ह‌यातील पत्रकारावरील हल्या बाबत 2019 च्या महाराष्ट्र अधिनियम क्र. 29 अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन शिरपुर मानव विकास पत्रकार संघ येथील पदाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले.

दरम्यान मानव विकास पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम जळगांव व साप्ताहिक दक्ष जळगांवचे उपसंपादक विकास पाथरे यांना दिनांक 20/9/23 रोजी दुपारी 3.00 वाजता वाळूमाफिया राहुल शांताराम ठाकरे (मोगली बाबा) यांनी विनाकारण मारहाण केली तसेच 40 ते 50 गुंडांना हाताशी धरून मारहान व जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याने त्यांच्या विरुध्द गुन्हा रजिस्टर 0290 दाखल केला आहे. तरी संबंधित हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये सन 2019 च्या महाराष्ट्र अधिनियम फिर्यादी मधील आरोपींवर कार्यवाही व्हावी.

 संबंधित फिर्यादी दारांना व त्यांचा परिवारास पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी मानव विकास पत्रकार संघाचे वतीने प्रशासनास करीत आहोत.

निवेदन देते वेळी मानव विकास पत्रकार संघाचे

प्रदेशाध्यक्ष वसिम खाटीक,जिल्हा उपाध्यक्ष अनंत बागुल,जिल्हा संघटक मोसिन शेख, तालुका अध्यक्ष आनंद निकम,प्रसिध्दी प्रमुख बिलाल शेख,जिल्हा सदस्य विशाल कोळी, तालुका सदस्य महेंद्र पाटील इ.पत्रकार बांधव उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 7 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे