Breaking
गुन्हेगारी

निफाड तालुक्यातील देवगाव येथील जगदंबा माता व जगन्नाथ महादेव मंदिरात चोरी

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 3 8

न्यायभूमी न्यूज 

देवगाव -दि. ३० सप्टेंबर प्रतिनिधी अजिज काद्री

देवगाव येथील जगदंबा माता देवी मंदिर व जगन्नाथ महादेव मंदिरात मध्यरात्री चोरी झाल्याची घटना बुधवार (ता.२७) सकाळी उघडकीस आली.अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी, देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र,नथ,दोन ५ फुटी समई तसेच जगन्नाथ महादेव मंदिरातील पितळ,तांबे व पंचधातूचे किमती ऐवज चोरुन नेल्याचे समोर आले आहे. मंदिरातील अंदाजे साठ हजार रुपयांच्यावर चोरी झाल्याचा अंदाज वर्तवल्या जात आहे.यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती मिळताच लासलगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

   जगदंबा माता देवीचे पुजारी पुंजाराम गुरव व दत्तात्रय बोचरे हे सकाळी देवीच्या पुजेसाठी देवी मंदिरात आले असता मंदिराचे कुलुप तुटल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे त्यांना मंदिरात चोरी झाल्याचा संशय आला.त्यांनी तात्काळ पोलीस पाटील सुनील बोचरे यांच्याशी संपर्क साधुन सदरील घटनेची माहीती दिली.दरम्यान परिसरात विजेची तार तुटल्याच्या कारणाने मंदिराचे cctv बंद होते. 

घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदे,पोलीस नाईक संदिप शिंदे,पोलीस नाईक औदुंबर मुरडनर यांनी पाहणी केली असता मंदिरातील देवीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने,समई तसेच जगन्नाथ महादेव मंदिरातील पितळ,तांबे व पंचधातूचे किमती ऐवज लंपास केल्याचे समोर आले.

पोलीसांनी मंदिर परिसरात पाहणी करून पूढील तपास पोलीस करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 3 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे