Breaking
ब्रेकिंग

चांदवड तालुक्यांत अंगणवाडीत नित्कृष्ट दर्जाचं अन्न निघाल्या अळ्या

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 1 1

न्यायभूमी न्यूज

चांदवड दि. ०७  प्रतिनिधी :- सोमनाथ जाधव

दि ७ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडेराव वस्ती वडाळीभोई येथील अंगणवाडीत नितकृष्टदर्जाच अन्न मुलांना खाऊ घातले जाते का? असा प्रश्न आता पालकांना पडला आहे भरत जाधव हे पालक आपल्या मुलांचे ऑनलाईन काम करण्यासाठी शाळेत गेले असता.

अंगणवाडीतील मुलांच्या पोषण आहार च्या गोण्या उघड्या दिसल्या त्या मध्ये त्यांनी डोकावून बघितल तर त्यांना अळी दिसल्या .त्यानंतर संबंधित अंगणवाडी सेवीका यांना त्या गोण्या फरशीवर ओतण्यास सांगितलं त्याबमध्ये भरपूर प्रमाणात अळी आणि बुरशी आढळून आल्या.

अंगणाडी सेविका यांना जाब विचारला असता त्यांनी सांगितले की हा आहार मागील महिन्यातील आहे.मग तुम्ही आमच्या मुलांना असला आहार खाऊ घालता का ? आमच्या मुलांच बर वाईट झाल तर त्याला कोण जबाबदार राहील असा प्रश्न ? संतप्त झालेल्या पालकांनी प्रश्न विचारला. त्यानंतर त्यांनी उपसरपंच शांताराम जाधव यांना बोलवून घेतले.

त्यांनी वरिष्ठ अधिकारी यांना साधून संपर्क करून बोलवण्यात आले.

वरिष्ठ परिचारिका आल्या त्यांनी सारवा – सारव केली आणि निघून गेल्या. परंतु एक असे निदर्शनात येते की पोषण आहार करणारे हे मुलांच्या जीवाशी खेळ खेळत आहे अशा कर्मचाऱ्यांवर योग्य कारवायी झाली पाहिजे.

यासाठी महिला बालकल्याण विभाग च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून योग्य ती कारवायी करावी.

त्या ठिकाणी उपस्थित पालकांनी आपला संताप व्यक्त केला.

उपसरपंच शांताराम जाधव भरत जाधव, जितेंद्र जाधव, विकास आहेर ,महेश जाधव, लहाणु .जाधव.निलेश जाधव आदी पालक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 1 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे