Breaking
गुन्हेगारी

निफाड तालुक्यात बोकडदरे शिवारात आढळले भेसळ युक्त दूध पोलिसांची मोठी कारवाई

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 1 8

न्यायभूमी न्यूज 

चांदवड दि. ११ ऑक्टोंबर

प्रतिनिधी सोमनाथ जाधव 

निफाड तालुक्यातील बोकडदरे शिवरात रसायनांचा वापर करून भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या इसमावर पोलिसांचे विशष पथकाने छापा टाकून कारवाई केली.

दिनांक १०/१० / २०२३ रोजी सकाळचे सुमारास निफाड पोलीस ठाणे हद्दीतील बोकडदरे शिवारात कातकाडे मळा परिसरात संशयीत इसम नामे अतुल वसंतराव कातकाडे हा त्याचे राहते घरात रसायनांचा वापर करून भेसळयुक्त दूध बनवित असल्याची गुप्त बातमी ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकाचे पोलीस उपअधीक्षक श्री. विशाल क्षीरसागर यांना मिळाली होती. सदर बातमी प्रमाणे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग, नाशिक विभागाकडील अन्न सुरक्षा अधिकारी श्री. उमेश सुर्यवंशी व श्री. योगेश देशमुख यांचेसह सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली असता, त्याठिकाणी इसम नामे अतुल वसंतराव कातकाडे, रा. बोकडदरे, कातकाडे मळा, ता. निफाड हा स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी दूधात पांढरे रंगाचे द्रव पदार्थाचे मिश्रण करतांना मिळून आला आहे. सदर ठिकाणाची पोलीसांनी पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याठिकाणी प्रभात मिल्क पावडर, मिल्की मिस्ट पावडर तसेच तेलयुक्त रसायन व पावडर मिश्रीत दूध असा एकूण ४८, १६४/- रूपये किंमतीचा साठा मिळून आला आहे.

 

यातील इसम नामे अतुल वसंतराव कातकाडे हा स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी वरील रासायनिक पदार्थापासून भेसळयुक्त दूध तयार करून विक्री करत असतांना आढळून आला आहे. सदर रासायनिक पदार्थांपासून तयार केलेले दूध हे मानवी शरिरास घातक आहे व त्यामुळे मानवी शरिरावर विपरीत परिणाम होऊ शकतो असे माहित असतांना देखील वरील इसम नामे अतुल कातकाडे व त्याचेसह घातक रसायन पुरवठा करणारे पुरवठादार व संगनमत असणारे इतर व्यक्ती यांचेविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी श्री. उमेश सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निफाड पोलीस ठाणे येथे अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम २६ (१), २६ (२) (i) शिक्षा कलम ५९ सह भादवि कलम ३२८, २७२, २७३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे यांचे मार्गदर्शनानूसार विशेष पथकाचे पोलीस उपअधीक्षक श्री. विशाल क्षीरसागर, पोहवा मनिष मानकर, पोना जगदीश झाडे, रविंद्र गवळी, संदिप सांगळे, मोहित निरगुडे, तसेच निफाड पोलीस ठाण्याचे सपोनि पाटील, पोउनि पटारे,पोकॉ दरोडे, सानप, मपोना कोकणे, शिंदे त्यांचे पथकाने सदर कारवाई करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे