Breaking
गुन्हेगारी

रात्री तरुणा सोबत बोलत असल्याने संशय,काकाने पुतणी ला कुऱ्हाडीने घाव घालून संपवलं…..

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 1 3

न्यायभूमी न्यूज

कोपरगाव दि २० ऑक्टोंबर 

रात्रीच्या सुमारास बाहेरील तरुणासोबत बोलत असल्याचा राग येऊन काकानेच आपल्या विवाहीत पुतणीला संपवल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील खडकी भागात घडली असून या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान रात्री उशिरा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

याबाबत मयत तरुणीची आईने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी रात्री त्यांची मुलगी सौ.नेहा संदीप कांबळे वय २१ वर्ष हल्ली रा.सप्तशृगी मंदीर जवळ खडकी कोपरगाव ही बाथरुम साठी घराबाहेर येवुन एका मुलासोबत बोलत असताना गुन्ह्यातील आरोपी संतोष हरीभाऊ आरणे वय २६ वर्ष रा.खडकी कोपरगाव याने बाहेरील मुलासोबत बोलत असल्याच्या कारणावरुन मयत हिचेवर संशय घेवुन तिला जिवे ठार मारण्याचे उद्देशाने कु-हाडीने तिच्या दोन्ही पायावर घाव करुन तिला जबर जखमी करुन जिवे ठार मारले आहे.

मयत नेहा तिच्याशी तिचा काका संतोष याचे गेल्या अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी दिली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात आरोपी संतोष आरणे विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 494/23 भारतीय दंड विधान कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास डीवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख करीत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे