Breaking
राजकिय

महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणा देत,भाजपाने केले आंदोलन

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 0 9 9

न्यायभूमी न्यूज 

येवला दि २१(प्रतिनिधी) पुष्पा पाटील

महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भात परिपत्रक काढण्यात आलेले होते.मात्र उलट त्यांनीच शिंदे-फडवणीस-पवार सरकारवर चिखलफेक करण्यात आली होती.

याचा निषेध म्हणून भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब डमाळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड घोषणाबाजी करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

            डमाळे पाटील यांचे नेतृत्वाखाली केलेल्या निषेध पत्रकात म्हंटले आहे की, कंत्राटी कामगार जीआर च्या बाबत महाविकास आघाडीचे विशेष करून,काँग्रेस,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे व त्यांच्या गटाचे नेते हेतू पुरस्सर पणे ना.एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस व अजित पवार सरकार वर चिखलफेक करित होते.

          राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस,यांनी पत्रकार परिषदेमध्ये कंत्राटी कर्मचारी भरतीचे संदर्भातील परिपत्रक हे महविकास आघाडी सरकारनेच काढलेले होते हे पूराव्यासह सांगून “दूध का दूध और पाणी का पाणी केले आहे.” आणि कंत्राटी कर्मचारी भरतीचा जीआर रद्द केला.

परंतू याबाबत आपल्या नेत्यांवरोर खोटे आरोप करून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न काँग्रेस व महाविकास आघाडीचे नेते करत आहेत.याला प्रतिउत्तर देण्याच्या दृष्टीने,आम्ही त्यांचा निषेध करतो अशा प्रकारचे निवेदनात म्हटले आहे.

सदरचे निवेदन तहसीलदार आबा महाजन यांनी स्वीकारले याप्रसंगी बाबासाहेब डमाळे पाटील,प्रमोद सस्कार,मनोज दिवटे,नानासाहेब लहरे,रत्नाताई गवळी,अनुपमा मडे,संतोष केंद्रे,बाळासाहेब कुरे,संजय खानापुरे,तरंग गुजराती,बापू गाडेकर,मनोज दारेज, चंपाचंद देवरे,डॉक्टर नंदकुमार शिंदे,डॉक्टर महेश जोशी, डॉक्टर गोविंद भोरकडे,वृशाल डमाळे,मच्छिंद्र आढाव,संजय भोसले,रावसाहेब भागवत,संजय भागवत,बद्री भंडारी,सखाहारी लासुरे,मनोज कापसे,यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे