Breaking
राजकिय

आता आमचा पक्ष फक्त मराठा पक्ष या धर्तीवर भुजबळ समर्थक समजल्या जाणाऱ्या जयदत्त होळकर यांनी पक्षाचा सर्व पदाचा सकल मराठा बैठकीत राजीनामा

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 3 4

न्यायभूमी न्यूज

लासलगांव दि २२ ऑक्टोंबर

प्रतिनिधी निशिकांत पानसरे 

 दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी आठ वाजता मारुती मंदिर हनुमान नगर …येथे सकल मराठा समाज यांचे वतीने 47 गाव येवला लासलगाव विधानसभा मतदार संघाची बैठक संपन्न सदर बैठकीत 47 गावातली हजारा पेक्षा जास्त लोक बैठकीत उपस्थित होते त्यात प्रामुख्याने तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.प्रथमता सर्वांचे स्वागत डॉक्टर सुजित गुंजाळ यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती होऊन बैठकीला सुरुवात झाली..सदर बैठकीमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाच्या दिशे संदर्भात अनेकांनी मार्गदर्शन केले या अनुषंगाने भुजबळ यांनी केलेला विरोध हा अत्यंत चुकीचा आहे त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा समर्थन यापुढे करायचं नाही याची सुरुवात म्हणून प्रत्येकाने आपापल्या पक्षाचे पदाधिकारी म्हणून राजीनामे द्यायचे नमूद केले .

त्यात सर्वात प्रथम भुजबळ समर्थक समजल्या जाणाऱ्या बब्बू काका उर्फ जयदत्त होळकर यांनी पक्षाचा महाराष्ट्र सरचिटणीस पदाचा व इतर सर्व पदाचा राजीनामा एकमुखाने सदर बैठकीत जाहीर केला तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी आप आपले राजीनामे द्यावेत व याना यांची जागा दाखवावी मराठा जसा वर पोहचवू शकतो तास खाली पण उतरवू शकतो असे कार्यकर्त्यांनी खडे बोल राज्य कर्त्यांना सुनावले.

कोणत्याही पक्षाच्या नेत्याने मत मागायला येणार असेल तर हातात कुणबी दाखला घेऊनच या अन्यथा मराठा तुम्हाला तुमची जागा कशी दाखवेन हे अनुभवा असा रोष मतदार संघातील मराठा बांधवांनी व्यक्त केला

 त्याबद्दल सर्वांनी त्यांचे टाळ्या वाजवून शिट्ट्या वाजून समर्थन केलं तसेच यापुढे प्रत्येक गावाला बैठक घेत येवला लासलगाव मतदार संघातील 153 गावात जागृतीच्या संदर्भात पुढील कार्यक्रम ठरविण्यात आला.

यापुढे कोणत्याही प्रकारचे येवला लासलगाव मतदार संघातून आमदार श्री छगनराव भुजबळ यांना समर्थन करायचे नाही. तसे मराठा कार्यकर्त्या कडून घडल्यास सदर व्यक्तींना मराठा संबोधन लावू द्यायचे नाही.व त्याला मराठा म्हणायचेही नाही असा एकमुखी निर्णय घेऊन, सदर कार्यक्रम हा तळागाळापर्यंत नेण्याचं सर्वांनी ठरवलं..

मंत्रालयात एक तृतीयांश आमदार जर मराठा समाजाचे आहेत तरीही ते जर आपल्या स्वार्थासाठी जर राज्यकर्त्यांची साथ देत असतील व आरक्षणासाठी झगडत तर अशा नेत्यांना मराठा समाज त्यांना जागा दाखवून देईल.

वेळ मागणे म्हणजे आपण पेटवलेल्या ज्वालावर पाणी टाकणे होय,कोण म्हणतो देणार नाही अरे घेतल्या शिवाय राहणार नाही.

जय जिजाऊ जय शिवराय या सर्व घोष वाक्यांनी परिसर दुमदुमून गेला व वातावरण कारे भगवे व मराठमोळ झाले..

हनुमान नगरचे सकल मराठा समाजाचे सदस्य हर्षल काळे यांनी आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे