Breaking
ब्रेकिंग

लासलगांव मध्ये ट्राफिक जाम सविस्तर वृत्त

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 0 9 9

न्यायभूमी न्यूज

लासलगांव दि २९ नोव्हेंबर निशिकांत पानसरे 

लासलगांव वरून पर्यायी रस्ता मनमाड मालेगाव इंदोर जाण्यासाठी 

मनमाड रेल्वे ओव्हर ब्रीज वरील येवल्याच्या दिशेने जाणारा रस्ता मोठ्या प्रमाणावर खचल्याने इदोर-मनमाड-पुणे या राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

 काही वाहने पुलावरच अडकली असून त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच अनेक वर्षाचा हा पुल असल्याने तो जीर्ण झाला होता.

मनमाड शहराच्या दोन भागांना जोडणारा हा पुल आहे.सकाळी सहा वाजे च्या दरम्यान ही घटना घडली असून सध्या पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

दरम्यान येवल्या कडून मनमाड कडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली असून मालेगाव कडे जाणारी वाहतूक आता येवला-नांदगाव मार्गे,तसेच येवला,विंचूर,लासलगांव मार्गे वळविण्यात आलेली आहे.

पण लासलगांव रेल्वे गेट मूळे लासलगांव विंचूर रस्ता चक्का जाम झालेला आहे.

लासलगांव मध्ये ट्राफिक ची गर्दीचं गर्दी बघायला मिळतं आहे.

पिंपळगाव बसवंत जाण्यासाठी रस्ता जाम झालेला आहे.

मनमाड शहराचा ऐतिहासिक वारसा असलेला इंदौर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिटिशकालीन हा पुल आहे. 

या पुलाची मुदत संपली असल्यानं त्याचं मागेच स्ट्रक्चर ऑडिट झालं होतं.मात्र,त्यानंतर कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्यात आलेली नव्हती. 

आज पहाटे पाच ते सव्वा पाच वाजेच्या दरम्यान या पुलाच्या पूर्वेकडील मोठा कठडा कोसळला.

 यामुळे मातीचा भराव असलेला मोठा भाग सुरक्षा कठड्या सहित कोसळला. 

यावेळी कोणत्याही प्रकारचे वाहन नसल्यानं मोठी दुर्घटना टळली.

1/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे