Breaking
गुन्हेगारी

येवला शहर व परिसरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट  

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 3 7

न्यायभूमी न्यूज 

येवला दि २६ नोव्हेंबर प्रतिनिधी एकनाथ भालेराव 

 आठ ते दहा दिवस उलटूनही गाडीचा अद्याप तपास नाही.

येवला येथील पत्रकार दीपक सोनवणे यांनी पाटोदा रस्त्यावरील एका हॉटेल समोर उभी करून ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. सोनवणे यांनी याप्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

सोनवणे हे रविवार ता. १७ रोजी येवला तालुका मराठी पत्रकार संघाची निवडणूक संदर्भात बैठक आयोजित केले असल्याने तालुक्यातील व शहरातील सर्व पत्रकार बांधव निवडणूक कार्यक्रम आवरून दुपारी सर्व पत्रकार बांधव हॉटेल रेणुका बांबू हाऊस येथे भोजन करण्यासाठी गेले असता पत्रकार दीपक सोनवणे यांनी त्यांनी आपली बजाज प्लेटीना एमएच १५ सीएच ३९७२ ही दुचाकी हॉटेल समोर उभी करून ठेवली होती.

या दुचाकीवर पाळत ठेवून असलेल्या अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली.

हॉटेल मधून बाहेर आल्यावर सोनवणे यांनी दुचाकी जागेवर नसल्याचे दिसले. त्यांनी परिसरात शोध घेतला. तरीही त्यांना दुचाकी आढळून आली नाही.

दुचाकीची चोरी झाल्याची खात्री पटल्यावर सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान येवले शहरातील नागरिक पथकांच्या गाड्या सुरू होत असल्याने सामान्य माणसांचं काय असा प्रश्न मात्र नागरिकांनी ठेवला आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे