Breaking
क्रिडा व मनोरंजन

कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे बाल आनंद मेळावा संपन्न

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 0 9 6

न्यायभूमी न्यूज

विंचूर दि ०२ जानेवारी

मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर 

     दिनांक:- 2 जानेवारी 2024 रोजी के.बी.पी. प्राथमिक विद्यालयात बाल आनंद मेळावा संपन्न झाला.

     विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच खरेदी विक्रीचे व्यवहार कळावे व प्रत्यक्ष व्यापार कसा करावा याचा अनुभव मिळावा हा उद्देश!

      विद्यालयातील इ.१ ली ते ४ थीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.मुलांनी वडापाव, सँडविच,पाणीपुरी,चनामसाला,इडली सांबर, पकोडे,कुरकुरे,बिस्कीट,चॉकलेट,वडापाव,पेरू, पोहे,चिवडा,भेळ,केळी,कांदे व खेळणी इत्यादी स्टॉल लावून खरेदी – विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

पालक बंधू भगिनींनी मोलाचे सहकार्य केले. जवळपास ७००० ते १०००० रुपयांपर्यंत व्यापार झाला.मुलांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला.

    या मेळाव्यास विंचूर पंचक्रोशीतील असंख्य नागरिकांनी हजेरी लावली.

      प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. खैरनार डी.एन.यांनी केले.कार्यक्रमाचे उद्घाटन जनरल बॉडी सदस्य मा.डॉ.श्री.सुजितजी गुंजाळ यांच्या हस्ते पार पडले.

      याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य मा.श्री.सुनील भाऊ मालपाणी,स्थानिक स्कूल कमिटी सदस्य मा. श्री. कैलासशेठ सोनवणे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.अनिलजी दरेकर,मा. प्राचार्य श्री. देवढे सर,पालक शिक्षण संघाचे उपाध्यक्ष मा.श्री.गणेशजी चव्हाण व इतर शिक्षण प्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. पवार व्ही. एन. यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन श्री. गायकर एल.बी.व सौ.खोंडे पी.आर.यांनी केले तर आभार श्री.गांगुर्डे एस.एस.यांनी मानले.

     या कामी सर्व शिक्षक वृंद व पालक बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.

उत्साही वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.

2.3/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे