Breaking
क्रिडा व मनोरंजन

काका साहेब नगर येथे माता – पालक,महिला क्रीडा स्पर्धांचे आयोजन

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 0 9 9

न्यायभूमी न्यूज

ओझर दि ११ जानेवारी उत्तम गारे 

     के. के. वाघ शिक्षण संस्था संचलित इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज काका साहेबनगर येथे विद्यार्थ्यांच्या माता- पालकांसाठी महिला क्रीडा स्पर्धा २०२३-२४ चे आयोजन दि. १३ जानेवारी २०२३ रोजी केले असून, ग्रामीण भागातील व विशेषत: गृहिणी महिलांना व त्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळावा हा हेतू जपत सदर स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.

त्याअंतर्गत धावणे, रस्सी खेच, गोळा फेक, डॉज बॉल, लगोरी, संगीत खुर्ची अशा मैदानी व मनोरंजनात्मक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर क्रीडा स्पर्धांमध्ये परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन के. के. वाघ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. शरद कदम यांनी केले आहे.

     अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी ९८६०३६५८७३ या क्रमांकावर संपर्क करावा.

 

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे