Breaking
कृषीवार्ता

निफाड तालुका परिसरातील विंचूर,देवगाव, नांदूर मध्यमेश्वर व लासलगाव मंडळातील ५० गावांतील एकूण २५२७ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४ कोटी १५ लाख ७० हजार रुपये मदत सविस्तर वृत्त

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 0 7 8

न्यायभूमी न्यूज

नाशिक दि १४ जानेवारी सह संपादक सुनील पोळ 

येवला मतदारसंघातील निफाड तालुका परिसरातील गारपीटग्रस्त २५२७ बाधित शेतकऱ्यांना ४ कोटी १५ लाख ७० हजार रुपये तर येवला तालुक्यातील गारपीटग्रस्त ३७७ बाधित शेतकऱ्यांना ७८ लाख ७७ हजार रुपये निधी वितरित

 राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला मतदारसंघात नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या गारपीट अवकाळी नुकसान मदतीचा आढावा घेतला. शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आलेली रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना वितरित करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी येवला प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाडच्या प्रांत अधिकारी हेमांगी पाटील, निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, येवल्याच्या नायब तहसीलदार पंकज मगर यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते. 

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून नोव्हेंबर २०२३ मध्ये येवला मतदारसंघातील निफाड तालुका परिसरातील गारपीटग्रस्त २५२७ बाधित शेतकऱ्यांना ४ कोटी १५ लाख ७० हजार रुपये तर येवला तालुक्यातील गारपीटग्रस्त ३७७ बाधित शेतकऱ्यांना ७८ लाख ७७ हजार रुपये मदत निधी मंजूर करण्यात आला आहे.

येवला मतदारसंघातील निफाड तालुका परिसरातील विंचूर, देवगाव, नांदूरमध्यमेश्वर व लासलगाव मंडळात तसेच येवला तालुक्यातील आंबेगाव, सोमठाण देश, निळखेडे व कातरणी परिसरात नोव्हेंबर २०२३ मध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. तसेच अधिक मदत मिळवून देण्याबाबत शेतकऱ्यांना आश्र्वासित केले होते.

त्यानुसार जिरायत,बागायत व फळ पिकांच्या प्रती हेक्टरी निफाड तालुका परिसरातील विंचूर,देवगाव, नांदूर मध्यमेश्वर व लासलगाव मंडळातील ५० गावांतील एकूण २५२७ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४ कोटी १५ लाख ७० हजार रुपये मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आली आहे. 

तसेच येवला तालुक्यातील आंबेगाव, सोमठाण देश, निळखेडे व कातरणी येथील ३७७ नुकसानग्रस्त ७८ लक्ष ७७ हजार रुपये मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात करण्यात आले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे