Breaking
क्रिडा व मनोरंजन

के.के.वाघ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज काकासाहेबनगर येथे महिला क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 0 2 3

न्यायभूमी न्यूज

कोटमगाव दि १९ जानेवारी ज्ञानेश्वर भवर

के.के.वाघ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज काका साहेबनगर येथे माता पालक, महिला क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मा. शकुंतलाताई वाघ, मा. रामनाथ आण्णा पानगव्हाणे, डॉ. बी. एल. जाधव हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विश्वस्त मा. शकुंतलाताई वाघ यांनी भूषविले. स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना डॉ. बी. एल. जाधव यांनी महिलांचे प्रत्येक क्षेत्रातील योगदानाबद्दल माहिती दिली. तर अध्यक्षस्थानावरून बोलतांना विश्वस्त मा. शकुंतलाताई वाघ यांनी ग्रामीण भागातील महिलांनी धावपळीच्या युगात स्वतःसाठी वेळ देऊन आपल्या स्वास्थ्यासाठी योग, प्राणायाम व खेळांचा दैनंदिन व्यवहारात समावेश करावा असे आवाहन केले. 

 

प्राचार्य श्री. शरद कदम यांनी आपल्या मनोगतात मोठ्या प्रमाणात महिलांनी या स्पर्धांसाठी उत्सुकता दाखवत उपस्थितीबद्दल सर्वांचे अभिनंदन व स्वागत केले. 

महिला क्रीडा स्पर्धांमध्ये पुढीप्रमाणे महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला. धावणे स्पर्धा – २१६, गोळाफेक – १६०, डॉच बॉल – १६२, लगोरी – १५४ अशा वैयक्तिक व सांघिक तसेच रस्सीखेच, संगीत खुर्ची या मनोरंजनात्मक स्पर्धांमध्ये एकूण ३२३ महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला.

स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.प्राचार्य श्री.शरद कदम यांच्या हस्ते सर्व स्पर्धांमध्ये विजयी महिला स्पर्धकांचे प्रमाणपत्र, ट्रॉफी व पुष्पुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

त्यामध्ये धावणे स्पर्धा : प्रथम – रुपाली सुनील कुशारे, द्वितीय – अश्विनी योगेश चोपडे. 

गोळाफेक : प्रथम – रुपाली सुनील कुशारे, द्वितीय – पूनम देविदास शिंदे. 

डॉच बॉल: प्रथम संघ – (राणी झांसी) – पूनम शिंदे, कविता चव्हाण, सीमा शिंदे, ज्योती कुशारे, योगिता जाधव, पूनम शिंदे, नीलिमा गांगुर्डे, स्वाती चव्हाण.

लगोरी : प्रथम संघ – (आम्ही मेरी) प्रतिमा गारे, सुनीता गारे, योगिता जाधव, मोनिका शिंदे, योगिता चव्हाण, कस्तुरी रायते.

सदर स्पर्धां यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक विलास गायकवाड यांनी सूत्रसंचालन यशवंत पवार, संदीप शिंदे,शीतल टर्ले यांनी तर आभार प्रदर्शन पूनम अष्टेकर यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे