Breaking
आरोग्य व शिक्षण

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 3 7

न्यायभूमी न्यूज

विंचूर दि २६ जानेवारी

मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर 

        आज दिनांक 26 जानेवारी रोजी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, विंचूर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित मान्यवर, विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार मंडळाचे सर्व सदस्य ग्रामपालिकेचे सरपंच उपसरपंच व सदस्य तसेच पालक व। विद्यालयातील विविध समित्यांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

       कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे स्वागताने करण्यात आली. विद्यालयाचे ध्वजारोहण विंचूर ग्रामपालिकेचे सरपंच सचिनजी दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच विद्यालयातील स्काऊट गाईड पथकाचे ध्वजारोहण कैलास शेठ सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रामपालिकेचे सरपंच सचिनजी दरेकर यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढली. विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाषणे व राष्ट्रभक्तीपर गीते सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. सदर कार्यक्रम प्रसंगी प्रवीण कुमार चव्हाण उपसरपंच ग्रामपंचायत विंचूर, डॉक्टर सुजित गुंजाळ रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य, पंढरीनाथ दरेकर, जगदीश काका जेउघाले, संजय शेवाळे पंचायत समिती सदस्य, , राजाराम दरेकर सतीश शेलार उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ, सोनाली कापडणीस सहसचिव पालक शिक्षक संघ, स्वाती धात्रक, सुनीता शिंदे, मिराताई दरेकर, दत्तात्रय व्यवहारे, अनिल दरेकर, शंकर दरेकर, विनायक जेऊघाले, डॉक्टर रमेश सालगुडे, मधुकर दरेकर, रामकृष्ण मवाळ, फिरोज मोमीन, मोतीराम दरेकर, बाळासाहेब सोनवणे, शांताराम कुसळकर, अशोक दरेकर, नानासाहेब गाडे, हरीश कांगणे, राजेंद्र मोरे, नंदकिशोर वाडेकर, सतीश सोनवणे, उत्तमराव बावधने, पत्रकार दत्तात्रय दरेकर, सुनील क्षीरसागर, दिनकर चव्हाण, हिरामण पेखळे, निखिल राऊत, मंगेश निकम, अमजद पठाण, सोमनाथ रसाळ, आरती जाधव, मालती जाधव, शाहिस्ता शहा, समीना मोमीन, जरीना मोमीन, शांताराम दरेकर, एस के आहेर, प्रवीण धवन, पी के जेऊ घाले आदी मान्यवर उपस्थित होते.

       सर्व कार्यक्रम विद्यालयाचे प्राचार्य देवढे एन ई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी विद्यालयामध्ये सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर चांदे आर के यांनी केले, तर भोसले व्ही सी यांनी आभार मानले.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे