Breaking
आरोग्य व शिक्षण

अचिवर्स युनिवर्सल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन व बक्षिस वितरण समारंभ संपन्न

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 2 3

न्यायभूमी न्यूज

कोटमगाव—प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर

पिंपळगाव बसवंत येथे २६ जानेवारी 

बालगोपाल, पालक व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पिंपळगाव बसवंत येथील अचिवर्स युनिवर्सल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन व बक्षिस वितरण सोहळा दिमाखात पार पडला. याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, डान्स, भाषण, कराटे व ड्रिल सादर करून उपस्थित पालक व मान्यवरांची प्रशंसा मिळवली. 

अध्यात्म व वास्तूशास्त्र या विषयातील विख्यात वारेकर गुरूजी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत अनुदान प्राप्त ‘वेदनेचे काटे’ या कवितासंग्रहाचे कवी सोमनाथ पगार व पालखेडस्थित दिव्यांग शेतकरी जोडपे पांडुरंग गुंजाळ व सविता गुंजाळ याप्रसंगी अतिथी म्हणून उपस्थित होते.

वारेकर गुरूजी यांनी राज्यघटना व तिचे महत्त्व याबद्दल माहिती दिली. 

कवी सोमनाथ पगार यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व विषद करून देशभक्तीपर कविता सादर केल्या. 

दिव्यांग शेतकरी पांडुरंग गुंजाळ यांनी शेती करतांना आलेल्या अडचणी कशा दुर केल्या, यासंबधी आपला अनुभव सांगुन उपस्थिततांची मने जिंकली. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री संकल्पना फाऊंडेशनचे चेअरमन गणेश खोडे, सेक्रेटरी सोनाली खोडे, संचालक योगेश विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रितम पाठे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

प्राचार्या रेशमा पाठे यांनी मन आकर्षित करणारे सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे