Breaking
महाराष्ट्र

धांद्री गावात वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उदघाटन

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 0 9 9

न्यायभूमी न्यूज 

सटाणा ( धांद्री ) दि.३१ जानेवारी –

बागलाण तालुक्यातील धांद्री गावात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन पक्षाचे नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ अहिरे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.

          संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा झंजावात वाढत चालला आहे. समाजातील तळागाळापर्यंत वंचित बहुजन आघाडीचा विस्तार होत आहे.त्याला बागलाण तालुकाही अपवाद नाही.

बागलाण तालुक्यातील धांद्री गावात शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत तसेच पक्षाचे नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष कपिल भाऊ अहिरे यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र बच्छाव यांनी भूषविले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव संजयभाऊ जगताप, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र बच्छाव, जिल्हा संघटक दिपक बच्छाव,विकास देवरे, सुनील जगताप जिल्हा नेते आनंद आढाव, यशवंत निकम,बंटी काकळीज आदी.प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष शेखरदादा बच्छाव यांनी केले.

यावेळी आदिवासी कार्यकर्ते संजय ठाकरे यांच्यासह आदिवासी कार्यकर्त्यांनी जाहीर रित्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ अहिरे यांनी महाराष्ट्रातील सर्व वंचित घटकांना न्याय देण्यासाठी, सत्तेत वाटा मिळण्यासाठी तसेच समाजातील सर्व तळागाळातील लोकांचा विकास करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी शिवाय तसेच ॲड. प्रकाशजी आंबेडकर यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.

यावेळी तालुका अध्यक्ष शेखर बच्छाव यांनी लवकरच तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या शेकडो शाखांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे सांगितले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धांद्री शाखा अध्यक्ष प्रशांत पवार, भास्कर गांगुर्डे,महासचिव गणेश मोरे, उपाध्यक्ष महेंद्र मोरे, समाधान बस्ते,स्वप्निल मोरे, राकेश बस्ते, शरद जगताप, राजेश पानपाटील, जयदीप मोरे आदींनी प्रयत्न केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका संघटक डॉ. सिद्धार्थ जगताप यांनी तसेच आभार तालुका महासचिव दादासाहेब खरे यांनी मानले.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे