Breaking
महाराष्ट्र

सातव्या प्रबोधन परिषदेचे उद्घाटक भाई अविनाश पाटील यांचे प्रतिपादन

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 2 9

न्यायभूमी न्यूज 

सटाणा दि. ३१ जानेवारी :

सटाणा येथे 2८ जानेवारी रोजी महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्य नगरीत समाज प्रबोधन संस्था आणि प्रगतिशील लेखक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सातव्या प्रबोधन साहित्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

बागलाणचे भूमिपुत्र आणि मराठीतले सुप्रसिद्ध कादंबरीकार राकेश वानखेडे हे त्या परिषदेचे अध्यक्ष होते . या परिषदेचे उद्घाटक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष भाई अविनाश पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जीएसटी आयुक्त अविनाश भामरे यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.

नरेंद्र दाभोळकर विचार मंचावरून बोलताना अविनाश पाटील यांनी ‘समाजप्रबोधनांमध्ये साहित्यिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून ते अनेक प्रथा, परंपरा, चालीरीती, आचार विचार, पोशाख, भाषा, लिपी, साहित्य, संस्कृती यावर प्रकाश टाकत असताना आपण एखाद्या पारंपारिक चौकटीत अडकलो आहोत की काय याचा सदैव घाण ठेवून लेखन केले तर निश्चित पणाने मानवी गरिमा आणि वैश्विक मूल्यांना हात घालता येऊ शकतो.

परंतु मराठी मध्ये असे हेतूतः प्रयत्न कमी झालेले आहेत. ‘ असे त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यघटनेचे प्रास्ताविकाचे वाचन करून प्रबोधन परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. प्रबोधन परिषदेचे स्वागताध्यक्ष, सटाणा आगार व्यवस्थापक राजेंद्र आहिरे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आले.

त्यानंतर आपल्या उद्घाटकाच्या मनोगतात भाई अविनाश पाटील यांनी साहित्यिकांमधल्या अंधश्रद्धा सुशिक्षितांमधल्या अंधश्रद्धा आणि या सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांचा शोषण व्यवस्थेशी असलेला संबंध आपल्या मनोगतातून व्यक्त केला. याप्रसंगी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, उद्योजक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या काही महत्वाच्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. तत्पूर्वी तहसील कचेरी बागलाण येथील अशोक स्तंभापासून सभागृहापर्यंत मशाल फेरी आयोजित करण्यात आली होती. 

यावेळी पारंपरिक संबळ व ताडपा वाद्याच्या तालावर पावरी नृत्य सादर करत पाहुण्यांचे स्वागत आज वातावरण निर्मिती करण्यात आली. दुपारी परिसंवादामध्ये पारंपरिक लेखक साहित्य पुढील गंभीर समस्या असा विषय घेऊन डॉ. आशुतोष पाटील आणि प्राध्यापक डॉ. सतीश मस्के यांनी अत्यंत मौलिक अशी मांडणी केली. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध कवी प्रमोद अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले ज्यामध्ये कसमादे परिसरातील नामवंत आणि मान्यवर कवींच्या कविता यावेळी सादर करण्यात आल्या. 

       कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ जगताप सचिव दादा खरे तसेच कार्यक्रमाला विशेष सहकार्य भाक्षीचे लोकनियुक्त सरपंच चेतन वणीस, आगार व्यवस्थापक राजेंद्र आहिरे, डॉ. रवींद्र सपकाळ यांचे लाभले तर कार्यक्रमासाठी यशस्वीतेसाठी शेखर बच्छाव, हिलाल ठोके, शशिकांत पवार, ठाकरे सर, प्रेरणा वानखेडे, अपूर्वा जगताप, अनिता खरे यांनी परिश्रम घेतले. परिषदेचे सूत्रसंचालन अरुण घोडेराव यांनी केले तर आभार केदा महिरे यांनी व्यक्त केले. 

या साहित्य परिषदेला तुकाराम चौधरी, संदीप ससाने, प्रा. शांताराम गुंजाळ, डॉ. मनोहर सोनवणे, रामदास पाटील, जितेंद्र बच्छाव, दीपक पाटील, शैलेंद्र गायकवाड, अविनाश आहिरे, केदा आहिरे, राजेंद्र गायकवाड, भूषण बच्छाव, विशाल बच्छाव, रोहिणी गायकवाड, संबोधी जगताप, प्रबोधिनी खरे, नागार्जुन जगताप,माधुरी अमृतकर, जयश्री गरुड, कडू वणीस, भास्कर गांगुर्डे यांसह तालुक्यातील ज जिल्ह्यातील अनेक नामवंत साहित्यिक कवी मोठ्या संख्येने साहित्य प्रेमी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे