Breaking
आरोग्य व शिक्षण

मुख्यमंत्री अभियाना अंतर्गत माझी शाळा,सुंदर शाळा कार्यक्रमाचे आयोजन

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 0 9 8

न्यायभूमी न्यूज

ओझर दि ३१ जानेवारी उत्तम गारे 

माधवराव बोरस्ते विद्यालय, ओझर (मिग) व जिजाऊ कॉम्प्युटर्स ॲंड नॉलेज इंस्टिट्युट, ओझर (मिग) यांच्या सयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना “वाटा करियरच्या” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते तसेच १० वी च्या विद्यार्थ्यांना परिक्षा मार्गदर्शनपर बनविलेल्या आर्टिकलचे शाळेचे मुख्याध्यापक श्री सोपान वाटपाडे सर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

प्रमुख वक्ते श्री अभिषेक येनकर यांनी १० वी च्या विद्यार्थ्यांना १० वी च्या परिक्षेनंतर कोणता विषय निवडायचा आणि आपले करियर कसे घडवायचे या बद्द्ल मार्गदर्शन केले.

तसेच दुसरे व्याख्याते हॅपी मोंगो कंपनीचे मार्केटिंग एग्जीकेटिव्ह रॉकी सर यांनी विद्यार्थ्याना आर्टिफिशिअल इंटिलिजंस व रिबोटिक्स या गोष्टिंचा अभ्यास करुन भविष्यात निर्माण होणाऱ्या नोकरीच्या संधीतुन आपले भविष्य कसे घडवता येईल या बद्द्ल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वाटपाडे सर यांनी केले प्रास्ताविक जिजाऊ कॉम्प्युटर्स ॲण्ड नॉलेज इंस्टिट्युचे संचालक श्री तुषार मंडलिक सर यांनी केले तसेच अभार प्रदर्शन विद्यालयाच्या पर्यवेक्षिका अनिता पाटिल यांनी केले.

तसेच विद्यालयात झालेल्या वार्षिक क्रिडा महोत्सवात रस्सीखेच स्पर्धेत विजेत्या मुलांच्या व मुलींच्या संघाना जिजाऊ कॉम्प्युटर्स ॲंड नॉलेज इंस्टिट्युट तर्फे संगणक क्षेत्रातील संपुर्ण भारतात चालणारा व राज्य शासन व केंद्र शानाच्या नोकरीसाठी अनिवार्य असणारा CCC या कोर्सचे 50% सवलतीचे गिफ्ट व्हाऊचर देवुन त्यांना गौरविण्यात आले.

 

यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप लिहिलेले लेख शिक्षिका जाधव आर ए मराठी, निकम आर् व्ही हिंदी, न्याहारकर एन बी इंग्रजी, देवरे एस पी गणित, सोनवणे डी डी सामाजिक शास्त्रे, तारू एम एम विज्ञान यांचे कौतुक करण्यात आले. सूत्रसंचालन शिक्षिका भाग्यश्री पगारे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 9 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे