Breaking
कृषीवार्ता

शेतकऱ्यांच्या कापसाला १२ हजार रु भाव द्या – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांची मागणी

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 3 6

न्यायभूमी न्यूज

नाशिक दि.१ फेब्रुवारी

     आज मनसे जिल्हा सचिव डॉक्टर विजयानंद कुलकर्णी यांच्या आदेशाने जामनेर तहसील कार्यालयावर कापसाला प्रती क्विंटल १२हजार रुपये भाव मिळावा यासाठी मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

     शेतकरी हा जगाचा पोशिंदा असताना व भारत हा कृषिप्रधान देश असताना देखील शेतकरीच आज मेटा कुटीला आल्याचे देशभर चित्र आहे. शेतकरी हा दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस रक्ताचे पाणी करून, मेहनत घेऊन एका दाण्याचे हजार दाने करण्याचे सामर्थ्य अंगी असताना त्याच्या कष्टाची जाण सरकार ला व शासनाला नाही की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील दोन वर्षां अगोदर हमी भाव बाजूला ठेवून व्यापाऱ्यांनी १० हजार रु क्विंटल ने कापूस काय खरेदी केला तर देशात असो की राज्यात खताचे भाव वाढलेत , बी बियाणे व कीटकनाशके यांचे भाव वाढलेत , गाव पातळीवर मजुरी व ट्रॅक्टर चे मशागती चे भाव अव्वा चे सव्वा झाले. सरकी चे भाव वाढलेत. यावरून सरकारने व शासनाने हा देखील निष्कर्ष काढणे आवश्यक आहे की शेतकऱ्याच्या घरात भाव वाढल्याने दिवाळी साजरी होण्या आधीच बाजारात त्याचे दिवाळे काढण्याची पूर्ण तयारी झालेली असते.

आम्ही शेतकरी कष्ट करून पिकवतो व इतरांच्या पोटाचा विचार करतो. मात्र शासन शेतकऱ्यांची पिकाची हमी घेतांना आज दिसत नाही.

   आज रोजी कापसाचे उत्पादन अत्यल्प प्रमाणात असताना ही कापसाला कवळी मोल भाव दिले जात आहे. मागच्या वर्षी चा कापूस च अजूनही शेतकऱ्यांच्या घरात पडून असताना ही या वर्षी देखील कापसाची तीच अवस्था आहे. शासनाने आता तरी शेतकऱ्यांच्या पिकाला भाव द्यावा अन्यथा बी बियाणे , रासायनिक खते, कीटकनाशके ,सरकी चे भाव तात्काळ कमी करावेत. कारण एका बाजूला कापसाचे भाव पडलेत तरीही हे भाव कमी व्हायला तयार नाहीत.

शेतकऱ्याला एकरी ३० ते ३५ हजार रुपये लागवडी पासून ते वेचणी पर्यंत येतो आणि एकरी उत्पादन ३ ते ५ क्विंटल कापूस होतो . कापसाचे भाव ६ ते ७ हजार रुपये असतात मग आता सरकारने च गणित सोडवावे खर्च वजा शेतकऱ्याच्या घरात किती रुपये येतात व उरतात…?

     शेतकऱ्यांचे पूर्ण आर्थिक गणितच यावरून कोलमडले चे दिसून येईल. दिवसेंदिवस शेतकरी हा कर्जबाजारी होत आहे आणि हेच चित्र असेच कायम राहिल्यास अनेक शेतकरी हे आत्महत्या करण्याच्या उंबरठ्यावर येऊन उभे असल्याचं सर्वत्र चित्र आहे .

     त्यामुळे शेतकरी जगला पाहिजे ही भूमिका शासनाने लक्षात घेऊन कापसाला किमान १२ हजार रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर करण्यात यावे.

  अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जामनेर ८ फेब्रुवारी गुरुवार रोजी, जामनेर तहसील कार्यालय समोर उपोषणाला बसणार आहे असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी निवासी नायब तहसीलदार यांना निवेदनातून दिला.

     यावेळी मनसे जिल्हा सचिव डॉ विजयानंद कुलकर्णी, मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील, मनसे तालुका सचिव किशोर पाटील, तालुका उपाध्यक्ष किरण अहिरे, सागर जोशी , नाना शिंदे, दत्ता पाटील , विनोद चव्हाण , अरुण भोसले , अमोल पाटील , वाल्मीक कोळी , रतन देशमुख , किशोर बडगुजर , स्वप्नील माळी , अशपाक देशमुख , राम भोसले , नाना गावंडे , जगदीश कुरकुरे, मयूर जोशी , सोपान लहासे, संदीप मराठे , लोकेश जोशी , गोविंदा बनकर , आशा ताई कोठारी , सोनू राजपूत , सागर पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 3 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे