Breaking
महाराष्ट्र

क.भा.पाटील विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समिती अध्यक्षपदी पंढरीनाथ सयाजी दरेकर व उपाध्यक्षपदी कैलास शेठ सोनवणे यांची निवड

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 1 0

न्यायभूमी न्यूज

विंचूर दि १ जानेवारी दत्तात्रय दरेकर मुख्य संपादक 

    विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात दि. ३१ जानेवारी २०२४ रोजी विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीची बैठक पार पडली.

त्यामध्ये शालेय विकासाच्या दृष्टीने अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. सदर प्रसंगी स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य जगदीश भाऊ जेऊघाले यांनी समितीच्या अध्यक्ष पदाची सूचना मांडली व त्यानुसार स्थानिक सल्लागार समितीचे सर्व सदस्य व स्कूल कमिटी सदस्य यांच्या सर्वानुमते समितीतील जेष्ठ सदस्य पंढरीनाथ सयाजी दरेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

तसेच कैलास शेठ सोनवणे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सदर निवडीस रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉक्टर सुजित गुंजाळ यांनी अनुमोदन दिले.

         या सभेसाठी रयत शिक्षण संस्था उत्तर विभागीय सल्लागार मंडळाचे सदस्य सुनील मालपाणी, स्कूल कमिटी सदस्य अनिल दरेकर, विद्यालयाचे प्राचार्य देवढे एन ई व रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य राजेंद्र चांदे हे उपस्थित होते.

          या बैठकीमध्ये शालेय विकासाच्या दृष्टीने अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष पंढरीनाथ सयाजी दरेकर व उपाध्यक्ष कैलास शेठ सोनवणे यांचे सल्लागार समिती व स्कूल कमिटी यांचे वतीने अभिनंदन करण्यात आले.

विद्यालयाच्या विविध समित्यांचे सदस्य, विद्यालयाचे हितचिंतक, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीनेही अभिनंदन करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे