Breaking
महाराष्ट्र

माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक पदवीत्तर पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक वर

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 3 2

न्यायभूमी न्यूज

कोटमगाव दि. ८ फेब्रुवारी प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर

सविस्तर वृत्त असे की,एस. एन.जे. बी.चांदवड महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंभेलनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.श्री गलांडे सर यांचा प्रसिद्ध सिनेकलाकर ,नाट्यकलाकर वेगवेगळ्या मालिकेत आपल्या भूमिकेने प्रेक्षकांना अंतर्मुख करायला लावणारे (तानी चित्रपटात, व श्वास चित्रपट व माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील अभिनेते )श्री अनीलजी नलावडे यांच्या शुभहस्ते ट्रॉफी व प्रशस्ती पत्रक देऊन गौरव करण्यात आला.

विविध कला ,क्रीडा व गुणवत्ता प्रदान विद्यार्थी व प्राध्यापकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव विद्यालयाचे जेष्ठ, ,व इतिहास विषय तज्ञ शिक्षक श्री. गलांडे अशोक पुंडलिक यांनी एम. ए.इतिहास ही पोस्ट ग्रॅज्युएट पदवी८२:८१% गुण मिळून प्राप्त केली. व महाविद्यालयात इतिहास,मराठी,राज्यशास्त्र,इंग्रजी ह्या सर्व विषयात पदवीत्तर पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला,श्री.गलांडे सर हे इतिहास विषयाचे गेल्या सतरा वर्षापासून मॉडरेटर म्ह. काम बघतात.इतिहास विषयाचे ते तज्ञ अभ्यासक आहे गेल्या २५वर्षापासून विविध कार्यक्रमांचे ते सूत्रसंचालन करत आहे.

त्यांच्या ह्या यशाबद्दल प्राचार्य श्री. शिंपी सर, प्रा .श्री.पाटील सर, प्रा .श्री संदीप पगार सर तसेच लासलगाव स्विमिंग ग्रुपच्या वतीने अध्यक्ष डॉ.अनिल बोराडे ,श्री. सुनील ठोंबरे,श्री राजू रानाजी,पत्रकार बंधू श्री निलेशजी देसाई श्री अरूनजी खांगाळ ,श्री नाना भवर,व सर्व सभासद बंधूंच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

तसेच माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता माणिक मढवई मॅडम,संस्थेचे अध्यक्ष श्री.अमोल मढवई सर,चेअरमन श्री.प्रतीक मढवई सर तसेच विद्यालयातील शिक्षक,श्री.केदारे सर,श्री.गांगुर्डे सर.श्री,दिवटे सर,श्री कदम सर, श्री देवढे सर. यांनी अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे