Breaking
आरोग्य व शिक्षण

नाशिक येथे सकल मराठा परिवार तर्फे आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 1 4

न्यायभूमी न्यूज

नाशिक दि १२ फेब्रुवारी

मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर 

सकल मराठा परिवार नाशिक टीम ही नेहमी समाज कार्य करत असते सद्याच्या परिस्थितीत रक्ताचा तुटवडा जाणवत असून, अशा वेळी रक्तदात्यानी पुढं यावे अशी हाक राज्य संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य यांनी दिली त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत सकल मराठा परिवार नाशिक टीम ने या मानवतेच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद देत,माणुसकीचा झरा या भावनेतून नाशिक सकल मराठा परिवारा तर्फे कालिका मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात 125 रक्तदाते यांनी आपले रक्तदान केले.या शिबिरासाठी कालिका मंदिर ट्रस्ट चे योगदान लाभले तर अर्पण ब्लड बँक व एस एम बी टी ब्लड बँक यांचेही सहकार्य भेटले.

या शिबिरात चेतन व पूजा लोखंडे या पती पत्नीने सोबतच जीवनातील पाहिले रक्तदान केले तर डॉक्टर विकास मेदगे यांनी 59 वे रक्तदान केले .या शिबिरात अनेक बांधवां सोबत महिला बगीनी यांनी सहभाग घेतला.अनेक रक्तदाते रक्तदानास येऊनही काही वैयक्तिक अडचणी मुळे रक्तदान करू शकले नाही हे शिबीर यशस्वी होण्यास सकल मराठा परिवार ग्रुप चे सर्व सदस्य यांनी मनस्वी प्रयत्न केले.

त्यासर्व सदस्यांचे आम्ही शतशः ऋणी आहोत तसेच सर्व रक्तदात्यांचे मनपुर्वक आभार आपण आमच्या वर जो विश्वास दाखवला तो आम्ही नेहमी सार्थ करू आपली साथ नेहमी आमच्या सोबत असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

या कॅम्प मध्ये युवा रकतदात्यांच्या मोफत थलेसेमिया टेस्ट करण्यात आली सकल मराठा परिवार टीम तसेच अनेक बांधव यांनी मेहनत घेतली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे